- सचिन कोरडे।पणजी : फिफा १७ वर्षांखालील विश्वचषकाला आता काहीच दिवस उरले असतानाच भारतीय फुटबॉलला एक झटका बसला. संघातील अंतिम संभाव्य २१ खेळाडूंची निवड प्रशिक्षक मातोस यांनी केली होती. या संभाव्य खेळाडूंतील एक खेळाडू हा वयोमर्यादेपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले. त्यामुळे तो विश्वचषकातून बाहेर पडला. आता प्रशिक्षक लुईस नॉर्टन दी मातोस यांना त्याच्या जागी दुसºया खेळाडूचा शोध घ्यावा लागेल. स्थानिक आयोजक समितीने (एलओसी) बाद झालेल्या खेळाडूचे नाव जाहीर केले नाही.‘फिफा’च्या मार्गदर्शक तत्त्वप्रणालीची अंमलबजावणी ‘एआयएफएफ’नेही केली होती. त्यानुसार, खेळाडूंचा ‘एमआरआय’ घेण्याचे सांगण्यात आले होते. दिल्लीला जाण्यापूर्वी खेळाडूंचा ‘एमआरआय’ व्हावा, असा आग्रह पोर्तुगीज प्रशिक्षक मातोस यांनी केला होता. या अहवालात संभाव्य खेळाडंूमधील एक खेळाडू ‘ओव्हरएज’ असल्याचे आढळून आले. खेळाडूंची ‘एमआरआय’ करण्याची अंतिम तारीख २१ सप्टेंबर होती. त्यानुसार, एआयएफएफने डेडलाईनच्या दोन दिवसआधीच खेळाडूंची चाचणी घेतली. उल्लेखनीय म्हणजे, भारतीय संघातील संभाव्य खेळाडंूची निवड काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आली होती.सहा महिन्यांपूर्वीही झाली होती चाचणीअखिल भारतीय फुटबॉल महासंघाने सहा महिन्यांपूर्वी फिफाच्या नियमानुसार एमआरआय चाचणी घेतली होती. त्यात सर्व खेळाडू पात्र ठरले होते.मात्र, आता केलेल्या चाचणीत भारताचा एक खेळाडू १७ वर्षांपेक्षा अधिक वयाचा असल्याचे आढळून आले. डॉक्टरांनी केलेल्या विशेष चाचणीत तो ग्रेड-६ मध्ये आहे.फिफाच्या नियमानुसार या श्रेणीतील खेळाडूला १७ वर्षांखालील स्पर्धेत सहभागी होता येत नाही, असे एका अधिकाºयाने सांगितले.
विश्वचषक आधीच टीम इंडियाला झटका, ‘एमआरआय’मध्ये एक खेळाडू ‘ओव्हरएज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:32 AM