- फ्रान्सची दुसऱ्यांदा विश्वविजयाला गवसणी
मॉस्को : अनुभवाच्या जोरावर फ्रान्सने दुसऱ्यांदा विश्वचषक पटकावला. फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम फेरीत फ्रान्सने दमदार खेळ करत क्रोएशियावर 4-2 असा विजय मिळवला आणि यंदाच्या विश्वचषकावर आपले नाव कोरले. या सामन्यात क्रोएशियाच्या संघाने जास्त वेळ चेंडू आपल्याकडेच ठेवला होता.पण फ्रान्सचा संघ हतबल झाला नाही. त्यांनी आपला बचाव मजबूत केला आणि जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी गोल करत विजय साकारला.
मॅनझ्युकीचचा क्रोएशियासाठी दुसरा गोल
- फ्रान्सचा चौथा गोल; एमबापेचे जोरदार आक्रमण
पोग्बाने केला फ्रान्ससाठी तिसरा गोल
ब्राझीलचा चॅम्पियन खेळाडू रोनाल्डिन्हो मैदानात
- अंतिम सामन्यात प्रेक्षकांचा धुडगूस
पहिल्या सत्रात फ्रान्सची 2-1 अशी आघाडी
- फ्रान्सचा 38व्या मिनिटाला दुसरा गोल, ग्रिझमनने मारली स्पॉट किक
फ्रान्सला 37व्या मिनिटाला पहिली स्पॉट किक
- असा झाला क्रोएशियाचा पहिला गोल
- पेरिसिचच्या गोलने क्रोएशियाची फ्रान्सशी बरोबरी
क्रोएशियाच्या पेरिसिचने केला दमदार गोल
- कसा झाला गोल, पाहा हे ट्विट
- क्रोएशियाने पहिला गोल फ्रान्सला दिला आंदण; मॅन्झुकिचकडून झाला गोल
अठराव्या मिनिटाला फ्रान्सला फ्री-किक
- सामन्याच्या अकराव्या मिनिटाला क्रोएशियाने गोलची संधी गमावली
- सामन्याच्या सुरुवातीपासून क्रोएशियाचे आक्रमण
महायुद्धाला सुरुवात....
- विश्वचषकासह जर्मनीचा माजी कर्णधार फिलीप लॅम्ब
- सौरव गांगुलीची 'दादागिरी' स्टेडियममध्ये दिसणार
- वेगाचा अनभिषिक्त सम्राट युसेन बोल्टले अंतिम फेरी पाहण्यासाठी स्टेडियमवर हजर
- कांटे की टक्कर... चाहत्यांचा दोन्ही संघांकडे सारखाच कल
मॉस्को : फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यातील फुटबॉल विश्वचषकातील अंतिम फेरीला काही मिनिटांमध्येच सुरुवात होणार आहे. फुटबॉल विश्वातले हे महायुद्ध पाहण्यासाठी चाहते सज्ज झाले आहेत. एकिकडे क्रोएशियाच्या संघाने पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. फ्रान्सचा संघ दुसऱ्या विश्वचषक पटकावण्यासाठी आतूर झाला आहे.
विश्वचषकासाठी असे असणार दोन्ही संघ
क्रोएशियाने आतापर्यंच विश्वचषकात एकही सामना गमवलेला नाही. प्रत्येक सामन्यात त्यांनी वरचढ कामगिरी केली आहे. दुसरीकडे फ्रान्सनेही पराभव पत्करलेला नाही. त्यामुळे अंतिम फेरीत दोन्ही संघांचे पारडे समसमान असेल.
अशी असेल दोन्ही संघांची रणनीती