नवी दिल्ली : भारतीय पुरुष फुटबॉल संघाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०२२ फिफा विश्वचषक स्पर्धेच्या आशियाई पात्रता लढती पुढील वर्षापर्यंत स्थगित करण्याच्या आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) निर्णयाचे स्वागत केले असून खेळाडूंचे स्वास्थ्य महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे.गेल्या आठवड्यात एएफसीने कोरोनामुळे २०२२ विश्वचषक व २०२३ आशियाई स्पर्धांच्या आॅक्टोबर व नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या सर्व पुरुष पात्रता लढती स्थगित करण्याचा निर्णय घेतला. भारत विश्वचषक पात्रतेच्या पुढच्या फेरीत स्थान मिळविण्याच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे, पण अद्याप २०२३ आशिया चषक स्पर्धेसाठी पात्रता मिळविण्याच्या शर्यतीत कायम आहे.
विश्वचषक फुटबॉल पात्रता सामने स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 2:45 AM