शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

१ लाख २१ हजारांचा दारूसाठा जप्त; १० जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 5:00 AM

राजम्मापल्ली येथे काही जण दारू गाळत असल्याची माहिती गाव संघटनेकडून मुक्तिपथ तालुका चमूला बुधवारी मिळाली. त्यांनी याच दिवशी सकाळी पाच जणांच्या घरी धाड टाकून तपासणी केली. यावेळी चार जणांच्या घरी मुद्देमाल सापडला. तीन घरी एकूण ३५० लिटर गुळाचा व मोहाचा सडवा तर एका घरी ६० लिटर दारू सापडली.

ठळक मुद्देसिरोंचा तालुक्यात कारवाई । दारूसह मोहसडवा, गूळ, साखर केले नष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तालुक्यातील राजम्मापल्ली आणि अमरावती येथे मुक्तिपथ आणि सिरोंचा पोलिसांनी संयुक्त कारवाई करून मोह व गुळाचा सडवा, दारू, गुळ, साखर असा एकूण १ लाख २१ हजारांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला. दोन दिवस ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी एकूण १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.राजम्मापल्ली येथे काही जण दारू गाळत असल्याची माहिती गाव संघटनेकडून मुक्तिपथ तालुका चमूला बुधवारी मिळाली. त्यांनी याच दिवशी सकाळी पाच जणांच्या घरी धाड टाकून तपासणी केली. यावेळी चार जणांच्या घरी मुद्देमाल सापडला. तीन घरी एकूण ३५० लिटर गुळाचा व मोहाचा सडवा तर एका घरी ६० लिटर दारू सापडली. हा सर्व २३ हजारांचा माल जप्त करून मुक्तिपथ तालुका चमूने सिरोंचा पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी या गावी पोहोचून हा मुद्देमाल नष्ट केला आणि चौघांवर गुन्हे दाखल केले. पोलीस उपनिरीक्षक शीतल धवील व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.तालुक्यातील अमरावती येथेही काही जण दारू गाळून त्याची विक्री करीत असल्याची माहिती शुक्रवारी मुक्तिपथ तालुका चमूला मिळाली. त्यांनी सिरोंचा पोलिसांना याची माहिती दिली. एकत्रितपणे १० घरी धाड टाकली असता सहा घरी एकूण १५ ड्राम गुळाचा व मोहाचा सडवा, ३० लिटर मोहफूल दारू, २० किलो गूळ आणि ३० किलो साखर, असा एकूण ९८ हजाराचा मुद्देमाल सापडला. हा संपूर्ण साठा पोलिसांनी नष्ट केला. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला. बीट अंमलदार बोरगडे, गुम्मला यांनी ही कारवाई केली.सिरोंचा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय अहिरकर यांच्या मार्गदर्शनात या दोन्ही कारवाया पोलिसांनी केल्या. पोलिसांनी एकूण १ लाख २१ हजाराचा साठा नष्ट केला. मुक्तिपथ संघटक सुनीता भगत आणि प्रेरक संतोष चंदावार दोन्ही कारवाईदरम्यान हजर होते.मुलेचरा तालुक्यात धडक कारवाईची गरजमुलचेरा तालुक्याच्या लगाम परिसरासह बऱ्याच ठिकाणी मोहफूल दारूची मोठ्या प्रमाणात अवैधरित्या खुलेआम विक्री होत आहे. या दारूविक्रीमुळे महिला व सुज्ञ नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासन व मुक्तिपथने संयुक्तरित्या लगाम परिसरासह मुलचेरा तालुक्यात धडक कारवाई करावी, अशी मागणी आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी