गडचिरोली तालुक्यातील चांदाळा, रानभूमी जंगल परिसरात माेठ्या प्रमाणात माेहफुलाची दारू गाळली जाते. जंगलाचा आधार घेऊन अनेकजण मोहसडवा टाकून दारू गाळतात. त्यानंतर परिसरातील गावांमध्ये तसेच स्वत:च्या गावातूनही ह्या दारूची विक्री केली जाते. रानभूमी गावात अवैध दारूविक्री केली जाते. तसेच गावाच्या माध्यमातून तालुक्यातील काही गावांना दारू पुरविल्या जाते. सोबतच गावात मद्यपींची लाईन लागलेली असते. यामुळे परिसरातील अनेक गावे त्रस्त झाले आहेत. भांडण तंट्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत गडचिरोली पोलीस ठाण्यात वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या. गडचिरोली पोलीस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या रानभूमी येथील जंगल परिसरात अहिंसक कृती करण्याचे ठरविले. त्यानुसार जंगल परिसरात शोधमोहीम राबवित २४ हजार रुपये किमतीचा चार क्विंटल मोहसडवा व इतर साहित्य जप्त करून नष्ट केले.
गडचिरोली तालुक्यातील काही गावातील मुजोर दारू विक्रेत्यांविरोधात गडचिरोली पोलिसांचे धाडसत्र सुरू आहे. ही कारवाई गडचिरोलीचे ठाणेदार दामदेव मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चंद्रभान मडावी, परशुराम हलामी, मुक्तिपथ तालुका संघटक अमोल वाकुडकर, उपसंघटक रेवणाथ मेश्राम यांनी केली.
मरेगाव व बाेथेड्यात दारूचे पाट
गडचिराेली तालुक्यातील मरेगाव व बाेथेड्यात मागील अनेक वर्षांपासून माेहफुलाची दारू गाळली जात आहे. त्यामुळे परिसरातील गावातील दारूडे दारू पिण्यासाठी दाेन्ही गावात जातात. तसेच येथून काही गावांमध्ये अवैधरित्या दारूचा पुरवठा केला जाताे. मरेगाव व मरेगाव टाेली ही गावे आरमाेरी पाेलीस स्टेशनअंतर्गत येतात तर बाेथेडा हे गाव गडचिराेली पाेलीस स्टेशनअंतर्गत समाविष्ट आहे. आरमाेरी व गडचिराेली पाेलिसांनी सदर गावांमध्ये धाड टाकून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
===Photopath===
100521\10gad_5_10052021_30.jpg
===Caption===
मोहसडवा नष्ट करताना पोलीस व मुक्तिपथ चमू.