शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीला धक्का! एकनाथ शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार
2
"महाविकास आघाडी फुटणार"; शिवसेना नेत्याचा मोठा दावा, म्हणाले, " २४ तासांत उद्धव ठाकरे..."
3
जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!
4
यमुना एक्सप्रेस वेववरून जात होती कार, पोलिसांना आला संशय, तपाणसी केली असता सापडला सोन्याचा खजिना
5
"ही चूक हरयाणात झालीये, महाराष्ट्रातही होतेय", पृथ्वीराज चव्हाणांनी ठेवलं मुद्द्यावर बोट
6
"दिल्लीत गुन्हेगारी वाढतेय, लोकांच्या मनात भीती असते की..."; आप नेत्याचा भाजपावर निशाणा
7
"बंटेंगे तो कटेंगे", मुंबईत योगींचे फोटो असलेले बॅनर्स; काय म्हणाले मुख्तार अब्बास नकवी?
8
चीनच्या जीडीपी एवढे झाले गोल्डचे मार्केट कॅप, 5 वर्षात व्हॅल्यू डबल; चेक करा देशातील सोन्या-चांदीचा लेटेस्ट दर
9
डॅशिंग IAS अधिकारी! वयाच्या ५७व्या वर्षी प्रेमविवाह; आता मंदिरांवरील लाऊडस्पीकरवर 'सवाल'
10
धर्मासाठी सिनेइंडस्ट्रीला केला रामराम, ३ हिट सिनेमात केलं होतं काम, सध्या काय करतेय २४ वर्षीय अभिनेत्री?
11
भाजपातील गटबाजीला कंटाळले, राष्ट्रवादीत गेले, तिथेही दिला राजीनामा; आता ठाकरेंकडे चालले
12
अजित पवार गट विधानसभेच्या किती जागा लढवणार? अजितदादा म्हणाले... 
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काका विरुद्ध पुतणी! गायत्री शिंगणे घड्याळ हातात बांधणार? अजित पवारांची घेतली भेट
14
कोण म्हणतं भाईजान घाबरला? बिश्नोईच्या धमक्यांदरम्यानच दिसणार सलमान खानचा 'चुलबुल पांडे' अवतार
15
भारत-चीन सीमावाद संपला; चिनी सैन्याची माघार, ड्रॅगनची 'गस्त करार'ला मंजुरी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : भाजपाला धक्का! मंदा म्हात्रेंविरोधात संदीप नाईक यांनी फुंकली 'तुतारी'
17
'गुडन्यूज कधी देणार?', संभावना सेठला ऐकावे लागताएत टोमणे; म्हणाली, "लग्नात महिलांनी..."
18
"अररियात राहायचे असेल तर हिंदू व्हावे लागेल", भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान, सोशल मीडियावर व्हायरल
19
बाबा वेंगा आणि नॉस्ट्रॅडॅमसची 2025 साठीची भविष्यवाणी, दिला मोठा इशारा!
20
Defence stocks मध्ये मोठी विक्री, Mazagon Dock, GRSE जोरदार आपटले

४५८ सरपंचांना महिन्याला १० हजार; सरपंच व उपसरपंचाच्या मानधनात दुप्पट वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 2:25 PM

उपसरपंचांनाही लाभ : मंत्रिमंडळाच्या निर्णयाने मानधन दुप्पट

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : ग्राम पंचायतीची धुरा सांभाळणाऱ्या सरपंच व उपसरपंचाच्या मानधनात शासनाने दुप्पट वाढ केली आहे. आता सरपंचांना १० हजार रूपयांपर्यंत मानधन मिळणार आहे. याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याचा लाभ जिल्ह्यातील ४५८ ग्राम पंचायतीच्या सरपंच, उपसरपंचांना मिळणार आहे. सरपंच व उपसरपंचांना अतिशय कमी मानधन दिले जात होते. त्यामुळे मानधनात वाढ करावी, अशी मागणी राज्यभरातील सरपंच संघटनांकडून केली जात होती.

सरपंच, उपसरपंचांचे मानधन दुप्पटसरपंचांना १० हजारांपर्यंत आठ हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या सरपंचाला १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. पूर्वी पाच हजार मानधन होते.

उपसरपंचांना चार हजारांपर्यंतसरपंचाच्या तुलनेत उपसर- पंचाला अर्धे मानधन आहे. आठ हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असेल तर चार हजार रूपये मिळतील.

जबाबदारीच्या मानाने अत्यल्प मानधनसरपंच व उपसरपंच हे अतिशय महत्त्वाचे पद आहे. त्यामुळे या पदाला शोभेल एवढे मानधन मिळणे अपेक्षित आहे. मात्र अत्यंत कमी मानधन मिळते.

वाढीव मानधन लोकसंख्या मानधन ० ते २००० : ६००० (सरपंच) २००० (उपसरपंच) २००० ते ८००० : ८००० (सरपंच) ३००० (उपसरपंच) ८००० हून जास्त : १०,००० (सरपंच) ४००० (उपसरपंच)

"सरपंच हे अतिशय महत्त्वाचे पद आहे. या पदाला साजेशे मानधन राज्य शासनाने देणे अपेक्षित आहे. मानधन दुप्पट केले असले तरी जबाबदारीच्या तुलनेत सदर मानधन अतिशय कमी आहे. यापेक्षा अधिक वाढीची अपेक्षा होती."- राजू उंदीरवाडे, सरपंच, गोगाव

"दोन हजार पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्राम पंचायतीच्या उपसरपंचाला केवळ एक हजार रूपये मानधन होते. आता दोन हजार दिले जाणार आहेत. ही एक प्रकारची उपसरपंच पदाची थट्टा आहे."- योगाजी कुडवे, उपसरपंच, आंबेशिवणी

 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली