आमटे परिवाराकडून कौतुक : निलेश पुंगाटीला ८३.२० टक्के गुणरमेश मारगोनवार - भामरागडज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दालन खुले करण्याचे काम केले. त्यांच्या कार्यामुळे भामरागडसारख्या आदिवासी बहूल दुर्गम भागात लोकबिरादरी प्रकल्पाची आश्रमशाळा उभी झाली. या आश्रमशाळेने दहावीच्या निकालात यंदा १०० टक्के यश मिळविले आहे. शाळेचा निलेश पुंगाटी हा विद्यार्थी ८३.२० टक्के गुण घेऊन आश्रमशाळेतून पहिला आला आहे. मराठी विषयात निलेशला ९१ गुण मिळाले आहे. या भागात माडीया भाषा बोलली जाते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे ज्ञान देणे हे इंग्रजी ही विदेशी भाषा शिकविण्यापेक्षाही अवघड आहे. अशा परिस्थितीत निलेशने मराठी विषयात ९१ गुण घेऊन शाळेच्या इतिहासातही मानाचा तुरा रोवला आहे. अतिशय मागास भागात राहणारे विद्यार्थी शाळेत असताना दहावीत १०० टक्के यश संपादन केले. ही निश्चितच गौरवाची बाब असल्याचे लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे यांनी सांगितले. या सर्व गुणवंताचे आमटे परिवाराने कौतुक केले.
१००% यशाने लोकबिरादरी चमकली
By admin | Published: June 18, 2014 12:11 AM