लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील चामोर्शी या तालुका मुख्यालयापासून ५ किलोमीटरवर असलेल्या वैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या चिचडोह प्रकल्पाचे काम बऱ्याच अंशी पूर्ण झाले आहे. प्रकल्पाच्या चाचणीसाठी पाणी अडविण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र शिल्लक राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी अजून १०० कोटी रुपयांची गरज भासणार आहे.या वाढीव निधीसाठी पाटबंधारे विभागाकडून शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. विदर्भ सिंचन विकास मंडळाअंतर्गत गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात या प्रकल्पातून जवळपास ११ हजार ५१० हेक्टर शेतजमीन सिंचनासाठी प्रस्तावित केली आहे.चिचडोह प्रकल्पाच्या उभारणीसाठी सन २०१०-११ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने मंजुरी दिली होती. काही वर्षानंतर या बॅरेजच्या कामाला सुरूवात झाली. प्रकल्प उभारणीसाठी शासनाच्या वतीने ५९७.४४ कोटी रुपयांचा प्रस्ताव पारित केला होता. मार्च २०१८ पर्यंत त्यापैकी ५३४.६६ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. परंतू प्रकल्पाचे काम पूर्णपणे झालेले नाही. हे काम पूर्ण करण्यासाठी आणखी १०० कोटी रुपयांची गरज असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.यासंदर्भात अभियंता राजेश किडेले यांनी सांगितले की, प्रकल्पाची चाचणी करण्यासाठी पाणी रोखले जात आहे. मात्र अजून काही काम बाकी आहे. त्या कामासाठी लागणाºया निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. ते काम झाल्यानंतर आणि चाचणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष पाण्याचा वापर सिंचनासाठी होऊ शकेल. निधी वेळेत मिळाल्यास पुढील वर्षीच्या रबी हंगामात हे पाणी सिंचनासाठी मिळण्याची शक्यता आहे.हे काम आहे बाकीचिचडोह प्रकल्पाचे जास्तीत जास्त काम झाले आहे. मात्र अजून एक बॅरेज, दोन्ही बाजुने प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम, रस्त्यांवर पुलांची उभारणी, विद्युत पुरवठा, स्विच यार्ड आदी कामे होणे बाकी आहे. ही कामे पूर्ण होताच प्रत्यक्ष सिंचनाला सुरूवात होऊ शकेल.
चिचडोह प्रकल्पासाठी हवेत १०० कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 10:17 PM
जिल्ह्यातील चामोर्शी या तालुका मुख्यालयापासून ५ किलोमीटरवर असलेल्या वैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या चिचडोह प्रकल्पाचे काम बऱ्याच अंशी पूर्ण झाले आहे. प्रकल्पाच्या चाचणीसाठी पाणी अडविण्याचे काम सुरू झाले आहे.
ठळक मुद्देप्रस्ताव शासनाकडे सादर : आतापर्यंत ५३४.६६ कोटी रुपये खर्च, काही काम शिल्लक