काेराेनाचे संकट लक्षात घेता मागील शैक्षणिक सत्रात अनेक दिवस शाळा बंद हाेत्या. दहावीचे वर्ग जवळपास दाेनच महिने भरले. त्यानंतर पुन्हा तिसरी लाट सुरू झाली. तिसरी लाट ओसरल्यानंतर मे महिन्यात दहावीची परीक्षा घेण्याचा विचार शासन करीत हाेते. मात्र तिसरी लाट अजूनही कायम आहे. दहावीची परीक्षा आता घेणे अशक्य असल्याचे शासनाच्या लक्षात आल्यानंतर शासनाने नववी व दहावीच्या गुणांच्या आधारे दहावीचा निकाल घाेषित करण्याचे सूत्र ठरविण्यात आले आहे. या सूत्रानुसार सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण हाेण्याची शक्यता आहे.
दहावीची परीक्षा कधीही जाहीर हाेऊ शकते, असा अंदाज बांधून विद्यार्थी आजपर्यंत अभ्यास करीत हाेते. मात्र शासनाने २८ मे राेजी निकालाचे सूत्र जाहीर करताच विद्यार्थी आता बिनधास्त झाले आहेत. दहावीची परीक्षा दरवर्षी बाेर्डामार्फत जाहीर घेतली जात हाेती. त्यामुळे आजपर्यंतच्या इतिहासात राज्यातील एकाही जिल्ह्याचा एकदाही दहावीचा निकाल १०० टक्के लागला नाही. मात्र यावर्षी प्रत्येक जिल्ह्याचा निकाल १०० टक्के लागण्याची शक्यता आहे.
बाॅक्स
असे असेल नवे सूत्र
नववीतील गुणांचे ५० टक्के व दहावीतील अंतर्गत मूल्यमापनावरून ५० टक्के गुण वापरून दहावीचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. दहावीचे अंतर्गत मूल्यमापन करताना विद्यार्थ्यांचे दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाला ३० गुण व गृहपाठ, ताेंडीपरीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे २० गुण दिले जातील.
बाॅक्स
विद्यार्थी खूश
दहावीच्या निकालाचे सूत्र जाहीर हाेईपर्यंत विद्यार्थी अधूनमधून अभ्यास करीत हाेते. मात्र शासनाने परीक्षा न घेताच निकाल जाहीर करण्याचे सूत्र २८ मे राेजी जाहीर केेले. निकालाचे सूत्र लक्षात घेतले तर प्रत्येक विद्यार्थी उत्तीर्ण हाेणार असल्याने विद्यार्थी खूश आहेत. आता ते केवळ निकाल घाेषित हाेण्याची प्रतीक्षा करीत आहेत.
बाॅक्स
अकरावीत मिळेल सहज प्रवेश
-गडचिराेली जिल्ह्यात अकराव्या वर्गाचे पुरेसे वर्ग आहेत. मागील वर्षीही जवळपास ९० टक्के निकाल लागला हाेता. तरीही अकरावीच्या प्रवेशाची काेणतीही समस्या जाणवली नाही. त्यामुळे यावर्षीही प्रवेशासाठी अडचण जाणवणार नाही.
अशी शक्यता आहे.
- दिवसेेंदिवस विद्यार्थ्यांचा ओढा विज्ञान शाखेकडे वाढत चालला आहे. त्यामुळे कला शाखेला विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. याचा ताळमेळ साधावा लागणार आहे.
पालक काय म्हणतात?
काेराेनाचे संकट लक्षात घेता आता परीक्षा घेणे शक्य नव्हते. त्यामुळे निकालाचे सूत्र ठरवून निकाल घाेषित केला जाणार आहे. ही चांगली बाब आहे. शिक्षकांनी अंतर्गत मूल्यमापनाचे गुण टाकताना विद्यार्थ्यांवर अन्याय हाेणार नाही. याची खबरदारी घेण्याची गरज आहे.
- याेगाजी बाेबाटे, पालक
इतर जिल्ह्यांतील शिक्षक अंतर्गत मूल्यमापनाचे गुण अधिक टाकतात. आपल्या जिल्ह्यातीलही शिक्षकांनी हे गुण व्यवस्थित टाकण्याची गरज आहे.
-शिवराम मडावी, पालक
जिल्ह्यातील दहावीचे एकूण विद्यार्थी - १७,५६०
मुले-९२८३
मुली-८२७७