लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पोलीस प्रशासन व जनतेमधील महत्त्वाचा दुवा समजल्या जाणाऱ्या पोलीस पाटलांच्या रिक्तपदांचा अनुशेष गडचिरोली जिल्ह्यात अद्यापही कायम आहे. नक्षली दहशत, संवेदनशील भाग व अत्यल्प मानधन आदी कारणांमुळे जिल्ह्यात पोलीस पाटलांची १०० वर पदे रिक्त आहेत. परिणामी या गावांचा कारभार पोलीस पाटलांविनाच गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे.जिल्ह्याच्या १२ तालुक्यात सहा महसुली उपविभाग असून प्रत्येक उपविभागात दोन तालुक्यांचा समावेश आहे. प्रत्येक गावात एक पोलीस पाटील असावा, असे शासनाचे धोरण आहे. या धोरणानुसार गडचिरोली जिल्ह्यात पोलीस पाटलांची जवळपास १ हजार ५१४ पदे मंजूर आहेत. यापैकी ९५० वर पदे भरण्यात आली असून २०० वर पदे रिक्त आहेत.गावातील शांतता व सुव्यवस्था टिकविण्यासोबतच गावातील तंटे गावातच मिटविण्याच्या कामातही पोलीस पाटील महत्त्वपूर्ण भूमिका बजावित असते. गावात घडलेल्या कुठल्याही गुन्ह्यांची तसेच घटनांची माहिती पोलीस पाटलांमार्फत पोलीस प्रशासनाला दिली जाते. पोलीस ठाणे, पोेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शांतता व सुव्यवस्थेबाबत पोलीस पाटलांशी नेहमी संवाद असतो. याशिवाय अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी पोलीस पाटील पोलीस प्रशासनाला मदत करीत असते. सार्वत्रिक निवडणुकीच्या कामातील सुव्यवस्था सांभाळण्यासाठी सुद्धा पोलीस पाटील सहकार्य करीत असते. त्यामुळे गावात पोलीस पाटलाचे पद अतिशय महत्त्वपूर्ण आहे.गडचिरोली, चामोर्शी, देसाईगंज, कुरखेडा, अहेरी हे सहा उपविभाग असून या सहा उपविभागाअंतर्गत १६०० वर गावे आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही उपविभागातील पोलीस पाटलांचे रिक्तपदे भरण्यासाठी संबंधित उपविभागाला आयुक्त नागपूर कार्यालयातून मंजुरी घ्यावी लागते. रिक्त असलेल्या पोलीस पाटलांचे रोस्टरही मंजूर करून घ्यावे लागते. ही सर्व प्रक्रिया प्रशासनाच्या वतीने उपविभागस्तरावर केली जाते. मात्र तीन हजार रुपये इतक्या अत्यल्प मानधनामुळे सध्याची युवा पिढी पोलीस पाटलाचे पद सांभाळण्यासाठी पुढे येत नसल्याचे दिसून येते.एक पोलीस पाटील सांभाळतो अनेक गावेगडचिरोली, चामोर्शी, देसाईगंज, आरमोरी हे चार तालुके शहरी भागालगत आहेत. तर इतर आठ तालुका नक्षल प्रभावित, अतिदुर्गम भागात मोडतात. पोलीस पाटील पदासाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवार मिळणे आवश्यक आहे, मात्र कुरखेडा, अहेरी, एटापल्ली या तीन उपविभागात नक्षली दहशत व अत्यल्प मानधनामुळे या पदासाठी उमेदवार अर्ज भरण्यास तयार होत नाही. प्रशासनाच्या वतीने दरवर्षी या पदासाठी भरती प्रक्रिया राबविली जाते. मात्र उमेदवार तयार होत नसल्याने पोलीस पाटलाच्या रिक्तपदाचा अनुशेष कायम राहतो.
१०० वर गावे पोलीस पाटलाविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 5:00 AM
जिल्ह्याच्या १२ तालुक्यात सहा महसुली उपविभाग असून प्रत्येक उपविभागात दोन तालुक्यांचा समावेश आहे. प्रत्येक गावात एक पोलीस पाटील असावा, असे शासनाचे धोरण आहे. या धोरणानुसार गडचिरोली जिल्ह्यात पोलीस पाटलांची जवळपास १ हजार ५१४ पदे मंजूर आहेत. यापैकी ९५० वर पदे भरण्यात आली असून २०० वर पदे रिक्त आहेत.
ठळक मुद्देरिक्त पदांचा अनुशेष कायम : नक्षल्यांच्या भीतीमुळे दुर्गम भागात उमेदवार मिळेना