गडचिरोली : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात काेराेना संसर्गाचे प्रमाण कमी कमी हाेत असल्याचे दिसून येत आहे. सध्या १७७ जणांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण वाढत असून मंगळवारी नवीन १४ रुग्ण बाधित आढळून आले, तर दिवसभरात १६ जणांनी काेराेनावर मात केली.
जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित ९ हजार १०८ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या ८ हजार ८२८ वर पोहोचली. तसेच सध्या १७७ क्रियाशील कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १०३ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९३ टक्के, क्रियाशील रुग्णांचे प्रमाण १.९४ टक्के, तर मृत्यू दर १.१३ टक्के झाला आहे.
नवीन १४ बाधितांमध्ये गडचिरोली ५, अहेरी २, चामोर्शी २, धानोरा १ व देसाईगंज येथील ४ जणांचा समावेश आहे. मंगळवारी कोरोनामुक्त झालेल्या १६ रुग्णांमध्ये गडचिरोली ६, अहेरी ७ व देसाईगंजमधील ३ जणांचा समावेश आहे. नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील आयटीआय चौक १, रामपुरी वॉर्ड कॉम्प एरिया १, कन्नमवार वाॅर्ड १, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये आलापल्ली १, बोरी १, चामोर्शी तालुक्यातील बाधितांमध्ये आष्टी १, इल्लुर १, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये चिचोडा १ व देसाईगंज तालुक्यातील बाधितांमध्ये कोंढाळा ३, स्थानिक १, तर इतर जिल्ह्यांतील बाधितांमध्ये २ जणांचा समावेश आहे.