लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात कोरोनाचा आलेख वाढतच आहे. २४ सप्टेंबर रोजी गुरूवारला एकाच दिवशी जिल्हाभरात एकूण ११९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण १५ जणांचा मृत्यू झाला. तर आज दिवसभरात ५४ जण कोरोनामुक्त झाले.सद्य:स्थितीत जिल्ह्यात क्रियाशील कोरोनाबाधितांची संख्या ६०३ इतकी आहे. आतापर्यंत एकूण बाधित २ हजार २९० रुग्णांपैकी १ हजार ६७२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारी आढळून आलेल्या नवीन ११९ बाधितांमध्ये गडचिरोली शहरातील ३९ जणांचा समावेश आहे. यामध्ये वनश्री कॉलनी ४, पंचायत समिती १, साईनगर १, कारमेल शाळा १, हनुमान वॉर्ड १७, केमिस्ट भवन १, सी-६० जवान ३, नवेगाव कॉम्प्लेक्स सुयोगनगर २, कॅम्प एरिया रामपुरी वॉर्ड १, चामोर्शी रोड २, इंदिरानगर १, कारगिल चौक शांतीनगर १, बेलगाव १, पारडी १, मेडिकल कॉलनी ५, साई गेस्ट हाऊस धानोरा रोड १, जिल्हा कॉम्प्लेक्स हायस्कूल सोनापूर १, सीआरपीएफ जवान १, आनंदनगर सेमाना रोड १, सोनापूर कॉम्प्लेक्स २, पोलीस स्टेशनमागे १, नेहरू वॉर्ड १, गोकुलनगर १ आदी ठिकाणच्या रुग्णांचा समावेश आहे.
कुरखेडा तालुक्यात ५५ यामध्ये राणीप्रताप वॉर्ड १, कढोली ३, अहेरी शहर १, आरमोरी तालुक्यात १५ यामध्ये वडधा ४, वैरागड १, आरमोरी शहर ९, चामोर्शी तालुक्यात ७ यामध्ये चामोर्शी शहर हनुमान वॉर्ड १, घोट १, सोनापूर विक्रमपूर २, धानोरा तालुक्यात ८ यामध्ये चातगाव १, कटेझरी १, धानोरा शहर ४, कारवाफा १, एटापल्ली तालुक्यात १५ यामध्ये सीआरपीएफ जवान ५, हालेवारा २, एटापल्ली ७, दुर्वा १, कोरची ३, सिरोंचा ६, देसाईगंज तालुक्यात २० यामध्ये सिंधी कॉलनी १, आरोग्य कर्मचारी १, जुनी वडसा ३, विसोरा १, गांधी वॉर्ड १, सीआरपीएफ जवान १, आंबेडकर वॉर्ड १, जवाहर वॉर्ड कोविड केअर सेंटर कर्मचारी १ व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे.जिल्हाभरात दिवसभरात एकूण ५४ जण कोरोनामुक्त झाले. यामध्ये अहेरी २३, आरमोरी १, चामोर्शी ६, धानोरा ३, गडचिरोली १२, कुरखेडा २ व देसाईगंज शहर व तालुक्यातील ७ जणांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढत आहे.
पालकमंत्री शिंदे कोरोना पॉझिटीव्हराज्याचे नगर विकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. ना.शिंदे यांनी बुधवारी कोरोना चाचणी करून घेतली असता त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. शिंदे यांची प्रकृती ठिक असून गेल्या काही दिवसांत आपल्याशी संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वत:ची कोविड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे ना.शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.