लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील १२ शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये प्राथमिक गटातून ११ शिक्षक व माध्यमिक गटातून एका शिक्षकाचा समावेश आहे.प्राथमिक गटातून पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये सिरोंचा तालुक्यामधील आसरअल्ली जिल्हा परिषद केंद्र शाळेचे शिक्षक सुरेश रामचंद्र चुधरी, भामरागड तालुक्यातील कोयनगुडा शाळेचे शिक्षक विनित बंडू पद्मावार, एटापल्ली तालुक्यातील बुर्गी जि.प. शाळेचे शिक्षक वणिता मारोतराव कन्नाके, धानोरा तालुक्यातील निमगाव शाळेचे शिक्षक देवेंद्र जगन्नाथ लांजेवार, कुरखेडा तालुक्यातील हेटीनगर शाळेच्या शिक्षिका वच्छला डोंगरू नरोटे, मुलचेरा तालुक्यातील मोहुर्ली शाळेचे शिक्षक अशोक धाडुजी बोरकुटे, चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा माल शाळेचे शिक्षक प्रभाकर पोचन्ना आचेवार, कोरची तालुक्यातील भुऱ्यालदंड शाळेचे शिक्षक संतोष नामदेव टिकले, देसाईगंज तालुक्यातील किन्हाळा शाळेचे शिक्षक अविनाश बालाजी ठाकरे, गडचिरोली तालुक्यातील खुर्सा शाळेचे शिक्षक सुरेश लक्ष्मण वासलवार, आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव प्राथमिक शाळेचे शिक्षक रवींद्र काशिनाथ सोमनकर यांचा समावेश आहे. माध्यमिक गटातून एटापल्ली जिल्हा परिषद हायस्कूलचे शिक्षक विनय लालसिंग चव्हाण यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा जि.प.च्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात ५ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते आदर्श शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर तर विशेष अतिथी म्हणून खासदार अशोक नेते उपस्थित राहणार आहेत.
१२ शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 10:41 PM
जिल्ह्यातील १२ शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये प्राथमिक गटातून ११ शिक्षक व माध्यमिक गटातून एका शिक्षकाचा समावेश आहे.
ठळक मुद्देशिक्षक दिनी होणार गौरव : जि.प. सभागृहात रंगणार सोहळा