थकबाकीदाराविरोधात : महावितरणची धडक कारवाई गडचिरोली : महावितरणच्या वतीने गडचिरोली, आलापल्ली विभागात घरगुती, औद्योगिक, वाणिज्यीक थकबाकीदारांविरोधात वीज पुरवठा खंडीत करण्याची धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. २४ डिसेंबर रोजी गडचिरोली व आलापल्ली विभाग मिळून जिल्ह्यातील एकूण १२४ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या ग्राहकांमध्ये गडचिरोली विभागातील ४३ व आलापल्ली विभागातील ८१ ग्राहकांचा समावेश आहे. थकबाकीदार ग्राहकांकडून थकीत असलेल्या रक्कमेचीही वसुली करण्यात आली. आलापल्ली विभागात २ कोटी ४४ लाख, गडचिरोली विभागात ३ कोटी ९० लाख रूपयांची थकबाकी ग्राहकांकडे आहे, अशी माहिती महावितरण चंद्रपूर परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी आनंद कुमरे यांनी दिली आहे. आपल्याला वीज पुरवठा करणारी महावितरण ही आपलीच कंपनी आहे, असे समजून ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा करून कंपनीस सहकार्य करावे, असे आवाहन चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
१२४ ग्राहकांची वीज कापली
By admin | Published: December 26, 2016 1:30 AM