लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात यावर्षीच्या पावसाळ्यात अतिवृष्टी, पूर व इतर नैसर्गिक आपत्तीशी दोन हात करण्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यासाठी तब्बल १२८ वाहने भाड्याने घेण्यात आली आहेत.आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत पुरवठा करण्यासाठी ही वाहने उपयोगी आणली जाणार आहेत. ही वाहने उपलब्ध करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी समाधानकारक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यादृष्टीने कोणत्याही आपत्तीला तोंड देऊन त्यावर मात करण्याची यंत्रणेची तयारी आहे.जिल्ह्यात वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता, गोमनी, गाढवी, सती, खोब्रागडी, वैलोचना, पर्लकोटा, इंद्रावती आदी नद्यांसह गडअहेरी नाला वाहतो. या नदी आणि नाल्यांना दरवर्षी पूर येतो. यामुळे नागरिकांना अडकून पडावे लागते.मान्सून अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. तत्पूर्वी आपत्ती व्यवस्थापनाची पूर्ण तयारी केली जात आहे. पुरासोबत माती खचने, भूपंक व इतर आपत्तीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी तसेच त्यांना आवश्यक ते साहित्य पोहोचविण्यासाठी या वाहनांचा उपयोग केला जाणार आहे. त्यात जीप, ट्रक, ट्रॅक्टर, टँकर, रोलर, टिप्पर आणि जेसीबीचाही समावेश आहे. ही वाहने पावसाळाभर उपलब्ध राहणार आहेत.मोबाईल संदेशातून मिळणार माहितीजिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी यांनी सांगितले, जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर किंवा इतर आपत्तीच्या परिस्थितीत नागरिकांना सतर्क करण्यासाठी एकावेळी २ लाख ७० हजार नागरिकांना मोबाईलवर संदेश पाठविला जाणार आहे. गाव, तालुका आणि जिल्हास्तरावर राहणाऱ्या लोकांच्या मोबाईलवर हा संदेश पाठविला जाईल.
आपत्ती निवारणासाठी १२८ वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 1:24 AM
जिल्ह्यात यावर्षीच्या पावसाळ्यात अतिवृष्टी, पूर व इतर नैसर्गिक आपत्तीशी दोन हात करण्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यासाठी तब्बल १२८ वाहने भाड्याने घेण्यात आली आहेत.
ठळक मुद्दे१५ जणांना कंत्राट : आपत्ती व्यवस्थापनाची चमू तयार