जिल्ह्यात सध्या १८५ क्रियाशील कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात एकूण १०३ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८४ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण २.०३ टक्के तर मृत्यू दर १.१३ टक्के झाला आहे. नवीन १३ बाधितांमध्ये गडचिरोली ७, आरमोरी २, चामोर्शी १, कोरची १, सिरोंचा १, व वडसा येथील एका जणाचा समावेश आहे.
बुधवारी कोरोनामुक्त झालेल्या ५ जणांमध्ये गडचिरोली ३, धानोरा १ व वडसामधील एका जणाचा समावेश आहे.
नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील शासकीय इंग्रजी शाळा २, नवेगाव कॉम्पलेक्स २, कॅम्प एरिया १, आरमोरी तालुक्यातील बाधितांमध्ये बोडधा १, स्थानिक १, चामोर्शी तालुक्यातील बाधितांमध्ये आष्टी १, कोरची तालुक्यातील बाधितांमध्ये बेतकाठी १, सिरोंचा तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक १, व वडसा तालुक्यातील बाधितांमध्ये सीआरपीएफ १, तर इतर जिल्ह्यातील बाधितांमध्ये २ जणांचा समावेश आहे.