ऑनलाईन लोकमतगडचिरोली : पोलीस विभाग, आदर्श मित्र मंडळ धनकवडी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभरातील महाविद्यालयांमध्ये गुरूवारी सद्भावना परीक्षा आयोजित करण्यात आली होती. जिल्हाभरातील सुमारे १०७ शाळांमधील १३ हजार २२१ विद्यार्थ्यांनी सदर परीक्षा दिली.बाल वयातच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीच जाणीव निर्माण व्हावी, त्यांच्यामध्ये देश, समाजाविषयी आपुलकी निर्माण व्हावी, त्याचबरोबर स्वत:च्या धर्माचा अभिमान बाळगतानाच इतर धर्माचाही आदर करण्याची शिकवण त्यांना मिळावी, या उद्देशाने सद्भावना परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, जैैन, बौद्ध, शिख या विविध धर्मांवर आधारित परिच्छेद देऊन त्यावर प्रश्न विचारण्यात आले होते. विद्यार्थ्यांना सर्व धर्मांची शिकवण ज्ञात व्हावी. चांगले विचार त्यांच्यामध्ये रूजावे, या उद्देशाने सदर परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला जिल्हाभरात चांगला प्रतिसाद मिळाला. एवढेच नाही तर नक्षलग्रस्त व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनीही परीक्षा दिली.ग्यारपत्ती आश्रमशाळेच्या १८४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्याचबरोबर सावरगाव आश्रमशाळेचे २५२ विद्यार्थी, भामरागड येथील २५०, कोरची येथील ७५, भगवंतराव उच्च माध्यमिक आश्रमशाळा गट्टाच्या १५०, कसनसूर आश्रमशाळेच्या ६०, अहेरी येथील ८००, आष्टी ८००, मुलचेरा येथील ४००, बोलपल्ली येथील ४०, कोटमीतील ५०, हालेवारा येथील ५०, एटापल्ली येथील ६०, चातगाव येथील ५००, पेंढरी येथील २५, जारावंडी येथील २५, मालेवाडा येथील १४८, कोटगूल येथील ७५, बेडगाव येथील २०७, कुरखेडा येथील २००, पुराडातील ७०, देसाईगंजातील २००, मुरूमगाव ८४, येरकड येथील ८५, धानोरातील ५३८, रेगडीतील २००, घोट येथील ३०, पोटेगाव येथील २२० तसेच आरमोरी, गडचिरोली व चामोर्शी तालुक्यातील ७ हजार १९४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.शांतीची शिकवणप्रत्येक धर्मामध्ये शांती व मानवतेची शिकवण देण्यात आली आहे. ही शिकवण विद्यार्थ्यांमध्ये रूजावी, या उद्देशाने परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दर्शविला. एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झालेली ही जिल्ह्यातील पहिलीच परीक्षा आहे.
१३ हजार विद्यार्थ्यांनी दिली सद्भावना परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 11:32 PM
पोलीस विभाग, आदर्श मित्र मंडळ धनकवडी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभरातील महाविद्यालयांमध्ये गुरूवारी सद्भावना परीक्षा आयोजित करण्यात आली होती. जिल्हाभरातील सुमारे १०७ शाळांमधील १३ हजार २२१ विद्यार्थ्यांनी सदर परीक्षा दिली.
ठळक मुद्देपोलीस विभागाचा उपक्रम : दुर्गम भागातही चांगला प्रतिसाद