दिगांबर जवादे
गडचिराेली: नगर परिषदेकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार गडचिराेली शहरात एकूण १३ हजार २३१ घरे तर ८ हजार १५८ नळधारक आहेत. प्रत्यक्ष घरांच्या तुलनेत नळधारकांची संख्या केवळ ६२ टक्के एवढी आहे. यावरून काही नळ अवैधरीत्या घेतले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांचा शाेध घेण्याची गरज आहे.गडचिराेली नगर परिषदेमार्फत बहुतांश वाॅर्डामध्ये पुरेशा प्रमाणात व शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जाते. त्यामुळे बहुतांश घरमालकांनी नळाची जाेडणी घेतली आहे. काही घरमालकांकडे भाडेकरू असल्याने हे घरमालक दाेन ते तीन नळजाेडण्या घेतात. गडचिराेली शहरात फेरफटका मारल्यास प्रत्येकाच्या घरी नळजाेडणी दिसून येते. तर काही जणांकडे दाेन ते तीन नळजाेडण्या आढळून येतात. तसेच शहराच्या ९० टक्के भागामध्ये नळाची पाईपलाईन पाेहाेचली आहे. त्यामुळे ज्या वस्त्यांमध्ये आजपर्यंत नळजाेडणी नागरिकांनी घेतली नव्हती त्यांनी सुद्धा नळजाेडणी घेण्यास सुरूवात केली आहे. या सर्व बांबींचा विचार केल्यास घरांच्या संख्येच्या तुलनेत किमान ९० टक्के नळजाेडणी असणे आवश्यक हाेते.मात्र केवळ ६२ टक्केच नागरिकांकडे नळजाेडणी असल्याची नाेंद नगर परिषदेकडे असून त्यांच्याकडूनच पाणीपट्टी वसूल केली जाते. याचा अर्थ काही नळजाेडण्या अवैध असल्याचे दिसून येते. त्यांचा शाेध घेतला जात नसल्याने अवैध नळ सुरूच आहेत. यामुळे नगर परिषदेला लाखाे रूपयांचा फटका बसत आहे ही अतिशय गंभीर बाब आहे. नगर परिषदेने स्वतंत्र पथकाची नेमणूक करून अवैध नळधारकांचा शाेध घेण्याची गरज आहे.
बाॅक्स
ताेट्यांचा प्रश्न गंभीर
पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रत्येक नळाला ताेट्या असणे आवश्यक आहे. मात्र नळाला ताेटी लावल्यास पाणी कमी येते असा गैरसमज नागरिकांमध्ये असल्याने बहूतांश नागरिक नळांना ताेट्याच लावत नाही. त्यामुळे कित्येक लिटर पाण्याचा अपव्यय हाेत असल्याचे दिसून येते. नगर परिषद काेणतीच कारवाई करीत नाही. तर दुसरीकडे नागरिकही सामाजिक जबाबदारी ओळखत नसल्याने ताेट्या लावत नाही.
बाॅक्स
नियमानुसार एका घराला एकच नळजाेडणी
नगर परिषदेच्या नियमानुसार एका घरटॅक्स पावतीवर एकच नळजाेडणी देता येते. मात्र भाडेकरू ठेवत असलेले अनेक घरमालक एकाच घरटॅक्स पावतीवर अनेक नळजाेडण्या घेत असल्याचे दिसून येते. त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे.
बाॅक्स
उत्पन्नापेक्षा खर्च अधिक
शहराच्या पाणीपुरवठ्यावर वर्षाकाठी दीड काेटी रूपये खर्च हाेतात. मात्र पाणीपट्टीच्या माध्यमातून नगर परिषदेला केवळ ९७ लाख रूपयांचा महसूल गाेळा हाेते. दरवर्षाला जवळपास ५० लाख रूपयांचा ताेटा नगर परिषदेला सहन करावा लागते, मात्र सामाजिक हेतू लक्षात नळयाेजना चालवावी लागत आहे.
बाॅक्स
१४ लाख रूपये वसूल
पाणीपट्टीची एकूण वार्षिक मागणी ९६ लाख २४ हजार रूपये आहे. मात्र त्यापैकी केवळ १४ लाख ७२ हजार रूपये पाणीपट्टी वसूल झाली आहे. पहिलेच नळयाेजना ताेट्यात चालविली जात आहे. त्यातच वसुलीही कमी हाेत आहे.