लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक इंदिरा गांधी चौकालगतच्या नवनिर्मित जिल्हा महिला व बाल रूग्णालयात १० मे पासून रूग्णभरतीची सुविधा उपलब्ध झाली आहे. १० पासून १४ मे पर्यंत या रूग्णालयात १४ नार्मल व १४ सिझर अशा एकूण २८ महिलांची प्रसुती सुरक्षितरीत्या करण्यात आली. या रूग्णालयाच्या बाह्यरूग्ण विभागात दररोज दीडशेवर रूग्णांची नोंद होत आहे. सदर रूग्णालय सुरू झाल्याने शहरासह जिल्ह्यातील रूग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.१०० खाटांची सुविधा असलेल्या या रूग्णालयात सोनोग्राफी, क्ष-किरण, प्रयोगशाळा, प्रसूती कक्ष, प्रसूतीपूर्व वार्ड, शस्त्रक्रिया कक्ष, आसीयू वार्ड, एनआयसीयू वार्ड आदींची सुविधा आहे. गेल्या पाच दिवसांत या रूग्णालयात २८ महिलांची प्रसुती झाली. यामध्ये १२ महिलांनी मुलांना तर १६ महिलांनी मुलींना जन्म दिला. १०० खाटांच्या या रूग्णालयात नऊ बेड प्रसुती रूममध्ये ठेवण्यात आले आहे. प्रसुतीपश्चात महिला रूग्णांसाठी ३१ बेडची व्यवस्था आहे. शिशू रूग्णांसाठी १४ बेड, तसेच गरोदर व प्रसुती मातासाठी चार बेडची व्यवस्था आहे. गर्भाशयाशी संबंधित महिला रूग्णांसाठी ३१ बेडची व्यवस्था आहे. १०० खाटांची व्यवस्था असली तरी येथे १५० रूग्ण दाखल राहू शकतात. या ठिकाणी सद्य:स्थितीत ६७ रूग्ण भरती होऊन औषधोपचार घेत आहेत. यामध्ये एका बालक रूग्णाचाही समावेश आहे.सदर रूग्णालयात गडचिरोली शहरासह जिल्हाभरातील तसेच जिल्हाबाहेरच्या भागातील रूग्ण बाह्यरूग्ण व आंतररूग्ण विभागात तपासणी व औषधोपचारासाठी येत आहेत.कोट्यवधी रूपये खर्च करून शासनाने गडचिरोली शहरात महिला व बाल रूग्णालयाची प्रशस्त इमारत उभारली. सदर इमारत तीन मजली आहे. तळमजला, पहिला मजला व दुसऱ्या मजल्याचा समावेश आहे. तळमजल्यात नोंदणी शाखा, औषधी कक्ष, वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, बाह्यरूग्ण विभाग, क्ष-किरण विभाग, सोनोग्राफी, प्रयोगशाळा व प्रतीक्षालयाची व्यवस्था आहे. पहिल्या मजल्यावर डॉक्टर रूम, प्रसुती कक्ष, प्रसुतीपूर्व वार्ड, शस्त्रक्रिया कक्ष, आयसीयू वार्ड, एनआयसीयू वार्ड, स्वयंपाक गृह व औषधी भांडार आदींची व्यवस्था आहे. दुसºया मजल्यावर गायनॅक वार्ड, अभिलेख कक्ष, प्रतीक्षालय, मुलांचा वार्ड, फॅमिली प्लॅनिंग वार्ड, पोस्ट आॅपरेटीव्ह वार्ड आदींची व्यवस्था आहे. सदर रूग्णालयात जिल्हा व जिल्हाबाहेरून येणाºया महिला व बाल रूग्णांवर औषधोपचार केला जात आहे.डॉक्टरांच्या सात जागा रिक्त, १० डॉक्टर कार्यरतगडचिरोली येथील महिला व बाल रूग्णालयात शासनाकडून वर्ग १ च्या वैद्यकीय अधिकाºयांची पाच पदे मंजूर आहेत. यापैकी केवळ वैद्यकीय अधीक्षकांचे एक पद भरण्यात आले आहे. उर्वरित चार पदे रिक्त आहेत. या रूग्णालयात वर्ग २ च्या डॉक्टरांची एकूण १३ पदे मंजूर आहेत. यापैकी १० पदे भरण्यात आली असून तीन पदे रिक्त आहेत. सदर रूग्णालयात २० परिचारिका कार्यरत असून इतर कर्मचारीही कार्यरत आहेत.सदर रूग्णालयात बाह्ययंत्रणेद्वारे २९ पदे भरावयाची आहेत. यामध्ये वर्ग ४ ची २४ व वर्ग ३ च्या पाच पदांचा समावेश आहे. वर्ग ३ मध्ये लिपीकवर्गीय कर्मचारी आहेत. तर वर्ग ४ मध्ये परिचर, कक्ष सेवक, शिपाई, सुरक्षा गार्ड व स्वच्छता कर्मचारी आदींचा समावेश आहे. सदर पदे शासनाने तत्काळ भरल्यास या रूग्णालयात रूग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळण्यास सोयीचे होणार आहे.जिल्हा सामान्य रूग्णालयावरील भार कमीशहरातील महिला व बाल रूग्णालय सुरू होण्यापूर्वी कॉम्प्लेक्स परिसरातील जिल्हा सामान्य रूग्णालयातील प्रसुती वार्ड तसेच बाल रूग्णाच्या वार्डात रूग्णांची गर्दी राहत होती. त्यामुळे कार्यरत असलेल्या अल्प डॉक्टर व आरोग्य कर्मचाºयांवर रूग्णसेवेचा भार येत होता. मात्र आता शहरातील हे नवीन महिला व बाल रूग्णालय सुरू झाल्याने जिल्हा रूग्णालयातील रूग्णसेवेचा भार काही प्रमाणात कमी झाला आहे.सदर महिला व बाल रूग्णालयात १० मे पासून रूग्ण भरती ठेवून त्यांच्यावर औषधोपचार केला जात आहे. रूग्णांनी निसंकोचपणे व सयंम बाळगून औषधोपचार घ्यावा. सकाळी ८.३० ते १२ व सायंकाळी ४ ते ६ अशा दोन वेळेत येथील ओपीडी सुरू राहते. महिला व बाल रूग्णांवर या रूग्णालयात औषधोपचार केला जातो. सदर रूग्णालयातील बाह्ययंत्रणेद्वारे २९ पदे भरण्याबाबतच्या प्रस्तावावर आक्षेप आल्याने हा प्रस्ताव शासनस्तरावर सुधारणेसाठी प्रलंबित आहे.- डॉ. दीपचंद सोयाम, वैद्यकीय अधीक्षक महिला व बाल रूग्णालय
१४ महिलांची सिझर प्रसूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 10:51 PM
स्थानिक इंदिरा गांधी चौकालगतच्या नवनिर्मित जिल्हा महिला व बाल रूग्णालयात १० मे पासून रूग्णभरतीची सुविधा उपलब्ध झाली आहे. १० पासून १४ मे पर्यंत या रूग्णालयात १४ नार्मल व १४ सिझर अशा एकूण २८ महिलांची प्रसुती सुरक्षितरीत्या करण्यात आली.
ठळक मुद्देदीडशेवर रूग्णांची ओपीडी : महिला व बाल रूग्णालयात ६५ वर रूग्ण दाखल