शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

काळी-पिवळी उलटून १४ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:51 PM

तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी जात असलेल्या कुरूळ येथील प्रवाशांचे काळी-पिवळी वाहन उलटल्याने १४ मजूर जखमी झाले. सदर घटना चामोर्शी-गडचिरोली मार्गावरील चामोर्शीपासून तीन किमी अंतरावर असलेल्या पेट्रोलपंपाजवळ मंगळवारी रात्री ७.३० वाजताच्या दरम्यान घडली.

ठळक मुद्देचामोर्शीजवळ अपघात : मिरची तोडाईसाठी तेलंगणात जात होते मजूर

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी जात असलेल्या कुरूळ येथील प्रवाशांचे काळी-पिवळी वाहन उलटल्याने १४ मजूर जखमी झाले. सदर घटना चामोर्शी-गडचिरोली मार्गावरील चामोर्शीपासून तीन किमी अंतरावर असलेल्या पेट्रोलपंपाजवळ मंगळवारी रात्री ७.३० वाजताच्या दरम्यान घडली.चामोर्शी तालुक्यातील कुरूळ येथील मजूर मिरची तोडण्यासाठी एमएच ३४ डी २३२९ या क्रमांकाच्या काळी-पिवळी वाहनाने मूल मार्गे तेलंगणा राज्यात जात होते. दरम्यान चामोर्शीजवळच्या पेट्रोलपंपाजवळ काळी-पिवळी वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे काळी-पिवळी वाहनाने समोरून येणाऱ्या एमएच ३३ व्ही २५४७ क्रमांकाच्या ट्रॅक्टरच्या रिकाम्या ट्रॉलीला धडक दिली. धडक एवढी जबर होती की, या धडकेने ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली. तसेच काळी-पिवळी वाहन सुध्दा रस्त्यावरच उलटले.या अपघातात काळीपिवळीत बसलेले शालिक परचाके (४५), मिराबाई मडावी (६५), पुष्पा परचाके (६५), सविता आगेवार (२५), नंदना मडावी (१३), देविदास आगेवार (३०), उज्वल मडावी (५), विद्या कुळमेथे (४०), निलकंठ कुळमेथे (४५), अनंता गेडाम (६५), कैलास मडावी (३८), हरीदास मडावी (२६), अल्का मडावी (३५), सुचिता मडावी (२४) सर्व रा. कुरूळ हे जखमी झाले आहेत. अपघात झाल्याची माहिती कळताच चामोर्शीचे ठाणेदार प्रकाश तुनकलवार यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना चामोर्शी ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.काळी-पिवळी रस्त्यावरच उलटली असल्याने काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. मात्र पोलिसांनी वाहन बाजुला करून मार्ग मोकळा केला. 

टॅग्स :Accidentअपघात