लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली पोलीस दलातून वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या १४ पोलीस कर्मचाऱ्यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.२ जुलै रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सेवानिवृत्तीनिमित्त गौरव करण्यात आलेल्यांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगांबर गंधेवार, सहायक फौजदार गणपत सिडाम, देवराव बोधनकर, गजानन अवदूत, देविदास नैताम, वासुदेव कोरेत, दलित चांदेकर, सहायक फौजदार देवराव पदा, आनंदराव पोटावी, जयराम गोटा, पोलीस हवालदार तुकाराम रायपुरे, लोमेश्वर बाळबुद्धे, सतीश सोनडवले, भीमराव मेश्राम आदींचा समावेश आहे.पोलीस हवालदार तुकाराम रायपुरे यांची मुलगी प्राजक्ता रायपुरे हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत अस्टिटंट इंजिनिअर ग्रुप-ए मध्ये निवड झाली. याबद्दल पोलीस अधीक्षकांच्या हस्ते रोख १० हजार रुपयांचे पारितोषिक, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.गडचिरोली पोलीस दलातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा फायदा झाला असून आपण पोलीस कुटुंबात जन्माला आलो, याचा अभिमान आहे, असे प्राजक्ता रायपुरे यांनी सांगितले. सेवानिवृत्त कर्मचाºयांनी पोलीस खात्यातील कामकाजाचे अनुभव कथन केले. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
१४ पोलीस कर्मचाऱ्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 10:21 PM
गडचिरोली पोलीस दलातून वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या १४ पोलीस कर्मचाऱ्यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. २ जुलै रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ठळक मुद्देसेवानिवृत्तीनिमित्त निरोप समारंभ : पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सत्कार