आॅनलाईन लोकमतगडचिरोली : जिल्हा पोलीस दलाच्या शिपाई पदाच्या भरतीसाठी शारीरिक क्षमता चाचणीत १४ हजार ५६६ पुरूष व महिला उमेदवार उर्त्तीण झाले आहेत. अवघ्या १२९ जागांसाठी होत असलेल्या या भरतीसाठी लेखी परीक्षेची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. मात्र उत्तीर्ण उमेदवारांपैकी जेमतेम १५०० ते १६०० उमेदवारांनाच मेरीट लिस्टनुसार लेखी परीक्षेची संधी मिळण्याची शक्यता आहे.या भरतीसाठी २८ हजार १७० उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी पुरूष उमेदवार २१ हजार ६७१ होते. त्यातून १६ हजार ४९६ उमेदवार प्रत्यक्षात चाचणीसाठी उपस्थित झाले. त्यातून १४ हजार ७४१ चाचणीसाठी पात्र ठरले तर १२ हजार ८१७ उमेदवार शारीरिक चाचणीत उत्तीर्ण झाले आहेत. भरतीसाठी ५३७९ महिला उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी ४४९७ प्रत्यक्षात उपस्थित झाल्या. त्यातून ३८२८ उमेदवार शारीरिक चाचणी देण्यासाठी पात्र ठरून त्यापैकी १७४९ महिला उमेदवार उत्तीर्ण झाल्या आहेत.महिला व पुरूष मिळून एकूण १४ हजार ५६६ उमेदवारांनी शारीरिक क्षमता चाचणी उत्तीर्ण केली असली तरी त्या सर्वांनाच लेखी परीक्षेला बसता येणार नाही. भरतीसाठी १२९ जागा असल्यामुळे एका जागेसाठी १२ उमेदवार बोलविल्यास जेमतेम १५४८ उमेदवारांना लेखी परीक्षेला बसता येईल. १४ हजार ५६६ उमेदवारांपैकी गुणवत्ता यादीनुसार अव्वल असलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेला बसविले जाईल. अद्याप लेखी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. संबंधितांना मोबाईलवर किंवा इ-मेलवर यासंदर्भातील माहिती पाठविली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
शारीरिक क्षमता चाचणीत १४ हजार ५६६ उमेदवार उत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 10:58 PM
जिल्हा पोलीस दलाच्या शिपाई पदाच्या भरतीसाठी शारीरिक क्षमता चाचणीत १४ हजार ५६६ पुरूष व महिला उमेदवार उर्त्तीण झाले आहेत. अवघ्या १२९ जागांसाठी होत असलेल्या या भरतीसाठी लेखी परीक्षेची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. मात्र उत्तीर्ण उमेदवारांपैकी जेमतेम १५०० ते १६०० उमेदवारांनाच मेरीट लिस्टनुसार लेखी परीक्षेची संधी मिळण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्दे१२९ जागांसाठी चुरस : मोजक्याच उमेदवारांना लेखी परीक्षेची संधी