शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

१४७ दुकानदारांची खत विक्री बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 11:08 PM

खतविक्रीसाठी पॉस (पॉर्इंट आॅफ सेल) मशीन सक्तीची केल्याने यावर्षी नोंदणीकृत १४७ दुकानदारांनी खतविक्रीकडे पाठ फिरविली आहे.

ठळक मुद्देपॉस मशीनचा परिणाम : जिल्हाभरात ३५३ दुकानदार करीत आहेत खताची विक्री

दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : खतविक्रीसाठी पॉस (पॉर्इंट आॅफ सेल) मशीन सक्तीची केल्याने यावर्षी नोंदणीकृत १४७ दुकानदारांनी खतविक्रीकडे पाठ फिरविली आहे.केंद्र शासन रासायनिक खतांवर मोठ्या प्रमाणात अनुदान देते. यापूर्वी कंपनीने खतविक्रीचे बिल सादर केल्यानंतर संबंधित कंपनीला अनुदानाचा लाभ दिला जात होता. याचा गैरफायदा खत कंपन्या उचलत होत्या. आगाऊ विक्री दाखवून अनुदान लाटले जात होते. या प्रकारावर आळा घालण्यासाठी मागील वर्षीपासून शासनाने खतविक्रीसाठी पॉस मशीन सक्तीची केली आहे. पॉस मशीनमध्ये संबंधित शेतकऱ्याचा आधारकार्ड क्रमांक टाकला जातो व त्याचे थम्बही घेतले जाते. ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय खतावरील अनुदान संबंधित कंपनीला मिळत नाही. त्यामुळे खतविक्रीसाठी केंद्र शासनाबरोबरच कंपन्यांनीही पॉस मशीनची सक्ती केली आहे.यापूर्वी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे नोंदणी केल्यानंतर खत विक्रीचा परवाना मिळत होता. या परवान्यावर खतविक्री केली जात होती. जिल्हाभरात ५०० खते विक्रेत्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी मागील वर्षी ३१४ व यावर्षी ३९ खतविक्रेत्यांनी पॉस मशीन खरेदी केली आहे. याचा अर्थ एवढेच दुकानदार खताची विक्री करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. १४७ दुकानदारांनी खतविक्रीचा व्यवसाय बंद केला असण्याची शक्यता आहे.पॉस मशीनचा वापर करण्यासाठी इंटरनेट सुविधा असणे आवश्यक आहे. दुर्गम भागातील अनेक गावांमध्ये अजूनही इंटरनेटसेवा पोहोचली नाही. त्यामुळे पॉस मशीन काम करीत नसल्याने दुकानदारांना खतविक्रीच्या व्यवसायावर पाणी फेरावे लागले आहे. गावकऱ्यांनाही आता तालुकास्थळावरून खताची खरेदी करावी लागत आहे. पॉस मशीनमधूनच खताचे बिलही निघत असल्याने दुकानदार अधिकचे पैसे संबंधित शेतकऱ्याकडून घेऊ शकत नाही. परिणामी यापूर्वी शेतकऱ्यांची होणारी फसवणूकही थांबली असल्याने शेतकऱ्यांनीही या योजनेचे कौतुक केले आहे.युरियाच्या बॅगचे वजन यावर्षीपासून ४५ किलोयुरियाची बॅग जरी शेतकऱ्यांना २७० रूपयांना मिळत असली तरी शासन या बॅगवर कंपनीला ४०० ते ५०० रूपयांचे अनुदान देते. कमी किमतीत खत मिळत असल्याने शेतकरी सर्वाधिक युरियाचा वापर करतात. युरिया हे रासायनिक खत आहे. रासायनिक खताचे जमीन व मानवी आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात. रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमीन नापीक होण्याचा सर्वाधिक धोका राहतो. त्यामुळे रासायनिक खताचा वापर कमी होण्याच्या दृष्टीने शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. शेतकाऱ्यांना प्रती एकरी दोन ते तीन बॅग टाकण्याची सवय झाली आहे. बॅगचे वजन कमी केल्यास खताचा वापरही कमी होईल, अशी आशा शासनाला आहे. त्यामुळे शासनाने यावर्षीपासून युरियाच्या बॅगचे वजन ५० किलो ऐवजी ४५ किलो केले आहे.रासायनिक खताचा वापर टाळून शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळविण्यासाठी शासनामार्फत शेतकºयांना मार्गदर्शन व अनुदानही दिले जात आहे.