शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

१५ जनावरांना जीवदान

By admin | Published: October 05, 2016 2:17 AM

सिरोंचामार्गे तेलंगणा राज्यात ट्रकमध्ये कोंबून नेण्यात येत असलेले ट्रक ताब्यात घेऊन १४ गायी व एका बैलाला सोडविले.

सिरोंचातील घटना : हिंदुत्ववादी संघटनांची कारवाईसिरोंचा : सिरोंचामार्गे तेलंगणा राज्यात ट्रकमध्ये कोंबून नेण्यात येत असलेले ट्रक ताब्यात घेऊन १४ गायी व एका बैलाला सोडविले. सदर घटना सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. गोदावरी नदीवर पूल झाला. तेव्हापासून एटापल्ली, भामरागड, सिरोंचा तालुक्यातील गायी, म्हशी, बैल खरेदी करून सदर जनावरे वाहनामध्ये कोंबून ती तेलंगणामध्ये नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सिरोंचामार्गे गायी व बैलांची तस्करी होत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार सिरोंचा तालुक्यातील हिंदुत्ववादी संघटना, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सापळा रचून सिरोंचाजवळ ट्रक अडविला. ट्रकमध्ये १४ गायी, एक बैल असल्याचे दिसून आले. सर्व जनावरांना व्यवस्थित ट्रकखाली उतरवून त्यांना सिरोंचा येथील कोंडवाड्यात टाकले. ट्रक चालकाची विचारपूस करीत असतानाच ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. बजरंग दलाचे कार्यकर्ते शंकर नरहरी यांनी भारतीय जनता पार्टीचे तालुका शहर अध्यक्ष संदीप राचेर्लावार यांना फोनवरून घटनेची माहिती दिली. त्यानंतर राचेर्लावार, रवी चकिनारपू, दिलीप शेनिगरापू, सल्लार सय्यद, सतीश गाटू यांनी घटनास्थळ गाठले. काही वेळानंतर सिरोंचाचे पोलीस निरीक्षक नागेश कदम, पशुधन विकास अधिकारी डॉ. चव्हाण हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. जनावरांना सुरक्षित बाहेर काढण्यात रमेश गट्टू, चंदू बातुल्ला, संपत तनगुला, रवी बोनंगोनी, गंगाधर कंबगोनी, अशोक मारशेट्टी, शंकर नरहरी, राजेश तनगुला, श्याम बेजन्नी, सुरेश पदीगेला, समय्या ओलाल्ला, मदनया मदेशी, सदाशिव कंबगोनी यांनी पार पाडली. या सर्व जनावरांना गोशाळेत पाठविले जाणार आहे. याबाबतची तक्रार सिरोंचा पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आल्यानंतर वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या कार्याचे कौतुक केले आहे. यानंतरही या मार्गावर पाळत ठेवून जनावरांची तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असा संकल्प करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)पुलामुळे जनावरांची तस्करी वाढलीगोदावरी नदीवरचा पूल बांधून पूर्ण झाला असून या पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे जनावर तस्करांसाठी रान मोकळे झाले आहे. एटापल्ली, भामरागड, सिरोंचा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. येथील पशुधन खरेदी करून सदर पशुधन तेलंगणा राज्यात वाहनाच्या सहाय्याने नेण्याचे प्रकार मागील महिन्यापासून वाढले आहेत. तेलंगणा राज्यात अजूनपर्यंत पूर्ण रस्ते झाले नाही. रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जनावरांची तस्करी आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याकडे सामाजिक कार्यकर्त्यांसह पोलीस व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा जनावरे तस्करीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.