आल्याने तीन दुकानदारांकडून १२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई पोलीस, नगरपरिषद व मुक्तिपथ तालुका चमूने १९ मे रोजी केली. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून
सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे कोरोना विषाणूचा पसार होत असल्याचे पुढे आले
आहे. त्यामुळे कोरोना महामारीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तंबाखूजन्य
पदार्थांची विक्री करण्यास बंदी घातली आहे. कायद्याचे होणारे उल्लंघन
थांबविण्यासाठी स्थानिक प्रशासन उपाययोजना करीत आहे. त्यानुसार आरमोरी
पोलीस, नगरपरिषद व मुक्तिपथ तालुका चमूने शहरातील दुकानांची तपासणी केली
असता तीन दुकानांमध्ये ७ मजा डब्बे, लहान ईगल पॉकेट १४, मोठे ईगल
पॉकेट ५, गुडाखू, साधा तंबाखू असा एकूण १५ हजारांचा तंबाखूजन्य पदार्थ जप्त
करण्यात आला. याप्रकरणी तीन दुकानदारांवर कारवाई करीत १२ हजार ५००
रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई पाेलीस हवालदार नारायण शेडमाके, न.प.
कर्मचारी राजू कांबळे, मंगेश चिचघरे व मुक्तिपथ तालुका संघटक नीलम हरिणखेडे
यांनी केली.