शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

१५८ मामा तलावांच्या दुरूस्तीचे नियोजन बिघडले

By admin | Published: June 22, 2017 1:30 AM

सिंचनासह विविध कामांसाठी पाण्याचा वापर करता यावा म्हणून जिल्ह्यातील १५८ माजी मालगुजारी

१५ कोटींची कामे अर्धवट : ३० जूनपूर्वी पूर्ण करावी लागणार लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : सिंचनासह विविध कामांसाठी पाण्याचा वापर करता यावा म्हणून जिल्ह्यातील १५८ माजी मालगुजारी (मामा) तलावांच्या दुरूस्तीचे काम गेल्या आर्थिक वर्षात (२०१६-१७) हाती घेण्यात आले. पण दुसरे आर्थिक वर्ष सुरू होऊन तीन महिने पूर्ण होत असताना हे काम पूर्णत्वास गेलेले नाही. त्यामुळे मामा तलावांच्या दुरूस्तीचे नियोजन बिघडल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाकडून मामा तलावांमधील गाळ काढून त्यांच्या दुरूस्तीसाठी वर्ष २०१६-१७ मध्ये १५.१५ कोटी रुपयांची तरतूद प्राप्त झाली होती. त्यातून जिल्हाभरातील १५८ मामा तलावांचे काम हाती घेण्यात आले. त्यासाठी निविदा काढून कार्यारंभ आदेशही देण्यात आला. पण निर्धारित वेळेत ही कामे पूर्ण झाली नाही. आधी १० जूनपूर्वी ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र नंतर ही मुदत वाढवून देऊन ३० जून करण्यात आली. वास्तविक काही भागात जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच पाऊस आल्यामुळे त्या भागातील तलावांच्या दुरूस्तीची कामे करणे कठीण झाले आहे. तरीही ३० जूनपूर्वी कामे पूर्ण करण्याचे आव्हान संबंधित कंत्राटदारांपुढे निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत या कामात दर्जा राहील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुरू असलेल्या कामांमध्ये सर्वाधिक ३२ मामा तलावांची कामे कुरखेडा तालुक्यात, २५ चामोर्शी तालुक्यात, २४ आरमोरी तालुक्यात, १६ वडसा तालुक्यात आहेत. सर्वात कमी भामरागड तालुक्यात असून तिथे फक्त १ काम घेण्यात आले आहे. गेल्या महिन्यापर्यंत या कामांवर १५.१५ कोटींपैकी फक्त ४८.३६ लाख रुपये खर्च झाले होते. यावरून कामांची गती किती संथ आहे हे स्पष्ट होते. मामा तलावांसोबत क्लस्टरची कामेही सुरू आहे. त्यात चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक ७ कामे, गडचिरोली २, धानोरा २, आरमोरी ५, वडसा ४, कुरखेडा ५, कोरची १, चामोर्शी ७, मुलचेरा १, अहेरी ३, एटापल्ली २, भामरागड १ आणि सिरोंचा तालुक्यात २ कामांचा समावेश आहे.