सध्या ४ हजार ३१८ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकूण ३११ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. १६ नवीन मृत्यूमध्ये ८९ वर्षीय पुरुष (ता सावली, जि.चंद्रपूर), ४२ वर्षीय पुरुष (रा. आरमोरी), ३५ वर्षीय पुरुष (रा. देसाईगंज), ४२ वर्षीय पुरुष (रा. धानोरा), ६५ वर्षीय पुरुष (रा. अनकोडा, ता. चामोर्शी), ५५ वर्षीय पुरुष (रा. कोरची), ४६ वर्षीय पुरुष (रा. बजरंगनगर, गडचिरोली), ३५ वर्षीय पुरुष (रा. गोगाव अडपल्ली, जि. गडचिरोली), ४४ वर्षीय पुरुष (रा. ब्रम्हपुरी, जि.चंद्रपूर) ,५२ वर्षीय महिला (रा. राजुरा, जि.चंद्रपूर), ४२ वर्षीय पुरुष (छिंदवाडा, मंध्यप्रदेश), ५० वर्षीय महिला (बोटेकसा, ता. कोरची), ५१ वर्षीय पुरुष (गडचिरोली), ४० वर्षीय पुरुष (रा. देसाईगंज), ६५ वर्षीय पुरुष (रा. चातगाव, ता.धानोरा), ७१ वर्षीय पुरुष (रा. आरमोरी) यांचा नवीन मृतांमध्ये समावेश आहे.
नवीन ५७१ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १८०, अहेरी ५२, आरमोरी २५, भामरागड २९, चामोर्शी ४१, धानोरा २५, एटापल्ली ३१, कोरची ३०, कुरखेडा ४८, मुलचेरा १२, सिरोंचा १४, तर देसाईगंज तालुक्यातील बाधितांमध्ये ८४ जणांचा समावेश आहे; तर आज कोरोनामुक्त झालेल्या ३१९ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील १४८, अहेरी ३२, आरमोरी २४, भामरागड २३, चामोर्शी १८, धानोरा ६ , एटापल्ली १४, मुलचेरा ३, सिरोंचा ७, कोरची ६, कुरखेडा ११, तसेच देसाईगंज येथील २७ जणांचा समावेश आहे.