वैरागड /आरमोरी : यंत्रणेच्या नाकावर टिच्चून आरमोरी तालुक्यातील डोंगरतमाशीच्या घाटावर राजरोस अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने दणका दिला. १५ मार्चला छापा टाकून १६ जणांना अटक करण्यात आली. यावेळी जेसीबी, पोकलेन, टिप्परसह सुमारे तीन कोटी ३० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
आरमोरी तालुक्यातील डोंगरतमासीजवळील खोब्रागडी नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसाने वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर १४ मार्च रात्री पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक उल्हास भुसारी यांना कारवाईसाठी रवाना केले.
उपनिरीक्षक दीपक कुंभारे ,राहुल आव्हाड व सहकाऱ्यांनी धाड टाकली. यावेळी जेसीबी, पोकलेनसह टिप्पर जप्त केले. घटनास्थळावरून ३ कोटी ३० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पकडलेल्या १६ आरोपींना १६ मार्चला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
यांचा आरोपींत समावेश
शंकर भुरे रा. वाटोडा (जि.नागपूर) ,राहुल घोरमोडे रा. बेटाळा (ता.ब्रह्मपुरी) ,सोनल ऊईके , धनंजय मडावी (दोघे रा. डोंगरतमाशी(ता.आरमोरी), यशवंत मडकाम रा. कुरंडीमाल (ता.आरमोरी) नीतेश मालोदे रा.नीलज(पवनी) अफसर अन्वर शेख रा. भिवापूर (जि.नागपूर) ,अब्दुल राजीक मोहम्मद इस्माईल कलीम कालनी (जि.अमरावती ),आताऊल्ला खान रियाज उल्ला खा रा.लालखडी (जि.अमरावती )नरेश ढोकरा. भिवापूर (जि.नागपूर )नासीर शेख बीडगाव रा.कामठी (जि.नागपूर), संतोष पवार रा. तळेगाव (जि.नागपूर), शेख वसीम शेख जलील रा. मंगळूर दस्तगीर (जि.अमरावती ),निखिल सहारे रा. विरली (लाखांदूर जि.गोंदिया)जावेद अमीर खान पांडुरना (जि.नागपूर) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.