शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

१६७ गावातील विद्यार्थ्यांना मिळणार शुल्कमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 1:02 AM

प्रशासनाने जिल्ह्यातील १६७ गावे टंचाईग्रस्त घोषीत केली आहेत. या गावांमधील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा लाभ दिला जाणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाचे मुख्याध्यापकांना निर्देश : टंचाईग्रस्त गावातील पालकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रशासनाने जिल्ह्यातील १६७ गावे टंचाईग्रस्त घोषीत केली आहेत. या गावांमधील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा लाभ दिला जाणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांचे प्रस्ताव २० एप्रिलपर्यंत सादर करावेत, असे निर्देश संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत.२०१७-१८ च्या खरीप हंगामात गडचिरोली जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस पडला. त्यामुळे बहुतांश गावांमधील शेतकऱ्यांचे धानाचे पीक करपले. शासनाने २८ फेब्रुवारी २०१८ रोजी गडचिरोली, मुलचेरा, देसाईगंज, आरमोरी, कोरची व सिरोंचा तालुक्यातील १६७ गावे टंचाईग्रस्त घोषीत केले आहेत. शासनाच्या नियमानुसार मार्च २०१८ मध्ये दहावी व बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ केले जाणार आहे.टंचाईग्रस्त गावांमध्ये गडचिरोली तालुक्यातील कनेरी, पारडीकुपी, मुडझा बुजू, मुडझा तुकूम, पुलखल, कोसनघाट, करकाझोरा, मौशीखांब, मरेगाव पॅच, मुलचेरा तालुक्यातील कोपरअली माल, मल्लेरा, कोपरअली चेक, देवदा, वेंगनूर, अंडगेपल्ली, सुरगाव, बोलेपल्ली, हेटाळकसा, पुल्लीगुंडम, गरंजी, देसाईगंज तालुक्यातील सावंगी, गांधीनगर, चोप, पेदा, कोरेगाव, एकलपूर, रामपूर तुकूम, बोडधा, बोडधा तुकूम, रावनवाडी, शंकरपूर, कळमगाव, शेलदालांबे, शेलदा तुकूम, डोंगरमेंढा, तुळशी, आमगाव, विसोरा, कसारी तुकूम, कुरूड, वडेगाव रिठ, कोकडी, किन्हाळा, शिवराजपूर, उसेगाव फरी, पोटेगाव, विठ्ठलगाव, डोंगरगाव, चिखलीरिठ, चिखली तुकूम, अरततोंडी, पिंपळगाव, विहीरगाव, विर्शी तुकूम, जुनी वडसा, नैनपूर या गावांचा समावेश आहे.संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कमाफीचे अर्ज भरण्यास सुरूवात केली आहे.आरमोरी तालुक्यातील ९७ गावांचा समावेशआरमोरी तालुक्यात सर्वाधिक ९७ गावे टंचाईग्रस्त घोषीत केली आहेत. यामध्ये जोगीसाखरा ग्रामपंचायतमधील गावे पळसगाव ग्रामपंचायत, कासवी, अरसोडा, वघाळा, आरमोरी नगर पंचायत, सायगाव, शिवनी बुज., शंकरनगर, चामोर्शी माल, वासाळा, ठाणेगाव, डोंगरगाव बुज., वैरागड, सुकाळा, मोहझरी, देलनवाडी, मानापूर, कुलकुली, भाकरोंडी, नूरचुली, कोरेगाव, पिसेवडधा, कुरंडी माल, वडधा, बोरी चक, देलोडा बुज., सिर्सी, कोसबी, इंजेवारी, देऊळगाव, किटाळी, चुरमुरा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.कोरची तालुक्यातील कोटरा, बोगाटोला व सिरोंचा तालुक्यातील बेजुरपल्ली ग्रामपंचायतमधील गावांना परीक्षा शुल्कमाफीचा लाभ मिळणार आहे.