लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सामूहिकरित्या चितळाची शिकार करून त्याचे मांस घरात शिजवत असलेल्या १७ आरोपींना गडचिरोली वनपरिक्षेत्राच्या चमूने अटक केली. हे सर्व आरोपी शिवणी व हिरापूर येथील रहिवासी आहेत.वनविभागाकडून प्राप्त माहितीनुसार, दोन्ही गावातील नागरिकांनी जाळे लावून जंगलात एका नर चितळाची शिकार केली. त्यानंतर त्याचे मांस शिजवण्यासाठी गावात आणल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी डी.व्ही.कैलुके यांच्या नेतृत्वात वनकर्मचाऱ्यांनी गावात जाऊन संबंधित आरोपींना ताब्यात घेतले. तसेच शिकारीचे जाळे, लोखंडी भाला, कुऱ्हाड, विळा, लाकडी खुंट्या, चितळाचे कच्चे व शिजवलेले मांस, त्याकरिता वापरलेली भांडी आदी साहित्य जप्त केले. याशिवाय आरोपींनी जंगलातील पश्चिम गुरवळा बिट नंबर १६६ या राखीव वनात शिकार केलेल्या ठिकाणी फेकून दिलेले कच्चे मांस, तोंड, शिंग, पाय जप्त करण्यात आले.या प्रकरणात शिवणी येथील आरोपी मनोहर उष्टुजी भोयर, गजानन लक्ष्मण चुधरी, बाजीराव मसाजी कांबळे, जगन्नाथ मसाजी कांबळे, संतोष मोरेश्वर मेश्राम, धनराज एकनाथ गेडाम, येमाजी एकनाथ गेडाम, रुषी हना भोयर, अमित राजेंद्र लाटलवार, जीवन दादाजी गेडाम, विनोद गणपत भोयर, योगाजी महादेव गेडाम तसेच हिरापूर येथील आरोपी पुरूषोत्तम तुकाराम भोयर, सुरेश पत्रुजी गेडाम, हिरामण तडकुजी गेडाम अशा १५ जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. मंगळवारी त्यांना न्यायालयाने वनकोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. याशिवाय दोन आरोपी अल्पवयीन असून त्यांना सुधारगृहात पाठविण्यात आले.वन्यजीवाच्या शिकारप्रकरणी एवढ्या मोठ्या संख्येने आरोपींना पकडण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही कारवाई मुख्य वनसंरक्षक डब्ल्यू.आय.यटबॉन, उपवनसंरक्षक शिवाजी फुले, सहायक वनसंरक्षक सोनल भडके, मानद वन्यजीव रक्षक मिलींद उमरे यांच्या मार्गदर्शनात वनविभागाच्या पथकाने केली.
चितळाची शिकार करणाऱ्या १७ आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:52 AM
सामूहिकरित्या चितळाची शिकार करून त्याचे मांस घरात शिजवत असलेल्या १७ आरोपींना गडचिरोली वनपरिक्षेत्राच्या चमूने अटक केली. हे सर्व आरोपी शिवणी व हिरापूर येथील रहिवासी आहेत. वनविभागाकडून प्राप्त माहितीनुसार, दोन्ही गावातील नागरिकांनी जाळे लावून जंगलात एका नर चितळाची शिकार केली.
ठळक मुद्देदोन गावांतील रहिवासी : मांस शिजवत असताना वनविभागाची कारवाई