शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

१७ लाख रोपांची होणार लागवड

By admin | Published: May 31, 2017 2:18 AM

वृक्ष लागवड उपक्रमाअंतर्गत १ ते ७ जुलै या कालावधीत जिल्हाभरात सुमारे १७ लाख १७ हजार वृक्षांची लागवड

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : वन विभाग लावणार १० लाख ५१ हजार वृक्ष लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : वृक्ष लागवड उपक्रमाअंतर्गत १ ते ७ जुलै या कालावधीत जिल्हाभरात सुमारे १७ लाख १७ हजार वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. गडचिरोली जिल्ह्याला १५ लाख ७८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते, अशी माहिती गडचिरोली वन विभागाचे उपवनसंरक्षक फुले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक विभागीय वनाधिकारी बी. पी. ब्राम्हणे उपस्थित होते. १ ते ७ जुलै या कालावधीत वृक्ष लागवड सप्ताह आयोजित केला जाणार आहे. याअंतर्गत राज्यभरात ४ कोटी वृक्षांची लागवड केली जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्याला १५ लाख ७८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट राज्य शासनाने दिले होते. यापेक्षा अधिक वृक्ष लागवडीचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले असून १७ लाख १७ हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे. यामध्ये वन विभाग १० लाख ५१ हजार, वन विकास महामंडळ ३ लाख ७ हजार, सामाजिक वनीकरण ४२ हजार, ग्राम पंचायत १ लाख ६६ हजार ३४२ व इतर यंत्रणा ९० हजार २५४ वृक्षांची लागवड करणार आहेत. वन विभाग ९९९.६३ हेक्टरवर वृक्ष लागवड करणार आहे. वन विकास महामंडळ ३९२.२६ हेक्टर, सामाजिक वनीकरण विभाग ६५.५ किमी अंतरावर वृक्ष लागवड करणार आहे. प्रत्येक ग्राम पंचायतीला सरासरी ३६४ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. रोप लागवड व संवर्धनासाठी जनतेचा जास्तीत जास्त सहभाग होण्याच्या दृष्टीने राज्यस्तरावर हरीत सेना नावाची साईट सुरू करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आतापर्यंत १४ हजार नागरिकांनी सदस्यत्व स्वीकारले आहे. ईच्छुक व्यक्तींना ग्रीन आर्मिचे सदस्य होण्यासाठी काही अडचण असल्यास गडचिरोली उपवनसंरक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा. या कार्यालयात स्वतंत्र संगणक कक्ष स्थापित करण्यात आला आहे. सदस्य नोंदणीच्या प्रक्रियेसाठी येथील कर्मचारी मदत करणार आहेत. वृक्ष लागवड हा कार्यक्रम केवळ प्रशासनाचा किंवा शासनाचा नसून प्रत्येक जनतेने या उपक्रमात सहभाग नोंदवावा. वृक्ष लागवड करून ते संवर्धन करण्यासाठी मोहीम उभारावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ग्राम पंचायत व प्रशासनाच्या मार्फतीनेही वृक्ष लागवडीबाबत जनजागृती केली जाणार आहे. गडचिरोली व देसाईगंजात वृक्षांचे स्टॉल गडचिरोली व देसाईगंज शहरात वन विभागाच्या मार्फतीने २५ ते ३० जून या कालावधीत स्टॉल लावून रोपे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या कालावलीत सवलतीच्या दरात रोपे दिली जातील, एका व्यक्तीला जास्तीत जास्त ५ व संस्थेला २५ रोपे दिली जाणार आहेत. १ ते ५ जुलै या कालावधीत मागणीनुसार घरपोच उपलब्ध करून दिली जातील. गडचिरोली शहरात इंदिरा गांधी चौक, जिल्हा रुग्णालयासमोरील बसथांबा व धानोरा मार्गावरील बसस्थानकाच्या परिसरात स्टॉल लावले जाणार असल्याची माहिती गडचिरोलीचे उपवनसंरक्षक फुले यांनी दिली आहे.