शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
5
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
6
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
7
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
8
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
9
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
10
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
11
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
12
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
13
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
14
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
15
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
16
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
17
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
18
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
19
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
20
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार

१७८ वैयक्तिक दावे मंजूर

By admin | Published: July 27, 2014 11:44 PM

अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम २००६, नियम २००८ व सुधारित नियम २०१२ च्या तरतुदीनुसार एटापल्ली तालुक्यातील ५४ गावातील भूधारक नागरिकांकडून वैयक्तिक

वितरित होणार : एटापल्ली तालुक्यातील ५४ गावांचा समावेशएटापल्ली : अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम २००६, नियम २००८ व सुधारित नियम २०१२ च्या तरतुदीनुसार एटापल्ली तालुक्यातील ५४ गावातील भूधारक नागरिकांकडून वैयक्तिक दाव्याचे प्रस्ताव मागविण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाने ५४ गावातील तब्बल १७८ वैयक्तिक दावे मंजूर केले आहे. या दाव्याचे वितरण सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत कार्यक्रमात करण्यात येणार आहे.मंजूर करण्यात आलेल्या वैयक्तिक दाव्यांमध्ये एटापल्ली तालुक्यातील गेदा येथील १८, दालदा येथील ३, दिंडवी १, उमगट्टा १, सिनभट्टी २, मुगनेर १, वडसाकला ५, कसनसूर २, वेनासर १, कोताकोंडा १, कोथरी ४, गडेरी ४, पुन्नर १, वाघेझरी १, उडेरा ३, आलदंडी २, तुमरगुंडा (खु.) १, तुमरगुंडा (बु.) १, वासामुंडी १, जवेली २, तोडसा १, आलेगा १, पेठा २, ताटीगुड्डम २, येमली २, मंगुळा १, सेवारी १, हालेवारा २, मवली १, दोडहुर ३, मरकल २, बुर्गी १, वटेली १, गोरगुटा ४, जांभिया १, जाजावंडी १, मोडस्के १, गुर्रेवाडा ५, हाचबोडी ३, तागुड्डा १, कोईदवशी ३, घोटसूर १, कारका (बु.) १, भूमकान ७, ताटपल्ली २, चंदनवेली १, एकनसून १, टेका १, कोहका १, रोपी १, भगदंडी १, चोखेवाडा ४, कोटमी १, पेडी १, जीवनगट्टा १, कमके २, उमरगट्टा १, एकरा (बु.) ३८, झुरी १, मुसमराम गुडा १ व एटावाही या गावातील ३ दाव्यांचा समावेश आहे. राजस्व व इतर विभागांतर्गत देण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती प्राप्त करून नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी केले आहे.अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम २००६, नियम २००८ व सुधारित नियम २०१२ च्या तरतुदीनुसार एटापल्ली तालुक्यातील वैयक्तिक दावे प्रशासनाकडे प्राप्त झाले नव्हते. त्यामुळे वैयक्तिक दाव्याचे प्रस्ताव प्रशासनाने भूधारकांकडून मागविले होते. अहेरीचे सहाय्यक जिल्हाधिकारी देवेंद्रसिंह यांनी उचित कार्यवाही करून जिल्हाधिकारी रणजितकुमार यांच्या सहकार्याने एटापल्ली तालुक्यातील ५४ गावातील तब्बल १७८ वैयक्तिक दावे निकाली काढले आहे. यामुळे या भूधारकांना दिलासा मिळाला आहे. वैयक्तिक दावे निकाली काढल्यामुळे नागरिकांना शासकीय योजनांचा तसेच कृषी योजनांचा लाभ घेता येणार आहे. प्रशासनाप्रती नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)