एसटी हे सर्वसामान्यांचे प्रवासी वाहन आहे. आगारातून प्रवासी घेऊन निघाल्यानंतर एसटी बसला शेकडाे किमीचा टप्पा गाठायचा असतो. बस मध्येच बंद पडू नये यासाठी आगारातून बस निघतेवेळी बसची तपासणी करण्याचा नियम एसटी कर्मचाऱ्यांना घालून दिला आहे. त्याचे कधी कधी पालन केले जात नाही. व्यवस्थित बस तपासली जात नसल्याने अर्ध्या रस्त्यातच काही तांत्रिक बिघाड निर्माण हाेऊन ती बंद पडते. तसेच एसटीचा प्रवास ग्रामीण भागातून असतो. ग्रामीण भागातील रस्त्याची अवस्था अतिशय वाईट आहे. खड्ड्यांमधून सतत वाहन धावत असल्याने नटबाेल्ट, राॅड तुटणे, यासारख्या घटना घडतात. एसटीत तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यानंतर प्रवाशांना एसटी दुरुस्त हाेण्याची किंवा दुसऱ्या एसटीची प्रतीक्षा करावी लागते. एसटीला प्रवाशांकडून धक्का मारून सुरू करण्याच्या अनेक घटना जिल्ह्यात घडतात. याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागतो. एसटी हे वाहन असल्याने त्यात कधीही तांत्रिक बिघाड निर्माण हाेऊ शकतो. ही बाब जरी मान्य केली तरी याेग्य ती काळजी घेतल्यास एसटी मध्येच बंद पडण्याचे प्रकार कमी करता येणे शक्य हाेते.
बाॅक्स
रस्त्यात एसटी बंद पडण्याची ही आहेत कारणे
आगारातून बस निघतेवेळी मेकॅनिकमार्फत व्यवस्थित तपासली जात नाही. खड्डेमय असलेले रस्ते, वेगाने बस चालविणे ही प्रमुख कारणे बस बंद पडण्यामागे असल्याचे दिसून येते. याबाबत एसटीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे.
१० वर्षांवरील बस
जेवढे बसचे वयाेमान अधिक तेवढी तिची कार्यक्षमता कमी हाेते. गडचिराेली व अहेरी आगारात १० वर्षांपेक्षा अधिक वयाेमान असलेल्या जवळपास ३० टक्के बस आहेत. याच बस बिघडण्याचे प्रमाण अधिक आहे. नवीन बस फार कमी प्रमाणात उपलब्ध हाेतात.
जंगलातील रस्त्यामुळे भीती
गडचिराेली जिल्ह्यातील बहुतांश रस्ते जंगलातून जातात. बस बंद पडल्यानंतर प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून दिले जाते. मात्र, काही मार्गांवर बसची संख्या अतिशय कमी राहते. दाेन ते तीन तासाच्या अंतराने दुसरी बस येते. अशा वेळी दुसऱ्या बसची प्रतीक्षा करणे शक्य हाेत नाही. मुख्य मार्गावर बस बंद पडल्यास वेळीच प्रवाशांना बस उपलब्ध हाेते.
काेट
रस्त्यात बस बंद पडल्यास प्रवाशांची माेठी गैरसाेय हाेते. त्यामुळे बस बंद पडू नये, यासाठी एसटी कर्मचाऱ्यांमार्फत विशेष काळजी घेतली जात असली तरी बस हे एक तांत्रिक साधन आहे. त्यात कधीही तांत्रिक बिघाड निर्माण हाेऊ शकतो. बस बंद पडल्यास प्रवाशांना त्रास हाेणार नाही, याची खबरदारी एसटीचे चालक व वाहक घेतात.
- अशाेककुमार वाडीभस्मे, विभाग नियंत्रक, गडचिराेली विभाग
बस बंद पडल्याच्या घटना
गडचिराेली ९०
अहेरी ८९