शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

१८ आदर्श गुरूजींचा गौरव

By admin | Published: September 10, 2016 1:11 AM

जिल्हा परिषद गडचिरोलीच्या वतीने शुक्रवारी जि.प.च्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार

शिक्षक पुरस्कार प्रदान : सक्षम व गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविण्याचे मान्यवरांचे आवाहनगडचिरोली : जिल्हा परिषद गडचिरोलीच्या वतीने शुक्रवारी जि.प.च्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात जिल्हाभरातील एकूण १८ आदर्श शिक्षकांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, भेटवस्तू, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सपत्नीक गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे तर अध्यक्षस्थानी जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी जावडे, समाज कल्याण सभापती विश्वास भोवते, महिला व बाल कल्याण सभापती सुवर्णा खरवडे, बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार, कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार, जि.प. सदस्य पद्माकर मानकर, शांता परसे, पुनम गुरनुले, अ‍ॅड. गजानन दुगा, वर्षा गावतुरे, पोरेटी, अशोक इंदुरकर, लैजा चालुरकर, पं.स. सदस्य सविता कावळे, वित्त व लेखाधिकारी राऊत, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) माणिक साखरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नानाजी आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एटापल्ली तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पुरसलगोंदीचे शिक्षक विजयकुमार हनुमय्या बुद्धावार, कोरची तालुक्यातील पकनाभट्टी जि.प. शाळेचे शिक्षक ओमकार चिंतामन ठलाल, अहेरी तालुक्यातील महागाव (बुज) शाळेचे शिक्षक सुधाकर भीमराव टेकूल, चामोर्शी तालुक्यातील रामपूर शाळेचे शिक्षक उमेश मारोती कोटनाके, आरमोरी तालुक्यातील वडधा शाळेचे शिक्षक सैनू महारू उसेंडी, सिरोंचा तालुक्यातील लक्ष्मीपूर येथील शिक्षक मधुकर चिन्ना बट्टीवार, देसाईगंज तालुक्यातील तुळशी शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर सावजी मेश्राम, कुरखेडा तालुक्यातील देऊळगाव शाळेतील शिक्षक नरेश रामजी बन्सोड यांचा आदर्श शिक्षक सपत्नीक सन्मान करण्यात आला. माध्यमिक विभागातून देसाईगंज तालुक्याच्या कुरूड जि.प. हायस्कूलचे नोमेश्वर भगवान मेश्राम, गडचिरोली जि.प. शाळेचे उच्च माध्यमिक शिक्षक सुनिल श्रावण चंदनगिरीवार यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सपत्नीक गौरव करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना जि.प. अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे म्हणाले, प्रत्येक माणसाच्या जीवनात शिक्षकांची भूमिका अनन्य साधारण आहे. भारतीय संस्कृतीत गुरूला प्रचंड महत्त्व आहे. त्यामुळे आदर्श व विशेष पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षकांनी स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी सर्वगुण संपन्न व्यक्तीमत्त्वाने घडलेले आदर्श विद्यार्थी घडवावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी उपस्थित सर्वच मान्यवरांनी गुणवत्तापूर्ण विद्यार्थी शिक्षकांनी घडवावेत, तसेच आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी आपला आदर्श कायम टिकवून ठेवावा. विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करावेत, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी (प्राथमिक) माणिक साखरे, संचालन केंद्र प्रमुख राजू वडपल्लीवार यांनी केले तर आभार शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नानाजी आत्राम यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)१७ शिक्षक उपस्थित, एक गैरहजरराज्यस्तरीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेले भिकारमौशी जि.प. शाळेचे प्राथमिक शिक्षक भाऊराव धर्माजी कुनघाडकर हे समारंभाला गैरहजर होते. त्यांचा पुरस्कार गडचिरोली पं.स.चे गट शिक्षणाधिकारी उद्धव डांगे यांनी स्वीकारला. उर्वरित सर्वच १७ शिक्षक आपल्या कुटुंबियासह आर्वजून उपस्थित होते.राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांचाही सत्कारराज्यस्तरीय शिक्षक पुरस्कारासाठी यंदा गडचिरोली जिल्ह्यातील चार शिक्षकांची निवड करण्यात आली. त्यांचा राज्य शासनाच्या वतीने सन्मान होणे शिल्लक आहे. मात्र निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या वतीने या चार शिक्षकांचा सपत्नीक गौरव करण्यात आला. यामध्ये गडचिरोली पंचायत समिती अंतर्गत शंकरराव मल्लेलवार हायस्कूल बोदलीचे मुख्याध्यापक मनिष भरतकुमार शेट्ये, नगरी जि.प. शाळेचे पदवीधर प्राथमिक शिक्षक राजेंद्र निलकंठ घुगरे, भिकारमौशी शाळेचे प्राथमकि शिक्षक भाऊराव धर्माजी कुनघाडकर व कोरची पंचायत समिती अंतर्गत भिमपूर शाळेचे शिक्षक प्रभू सीताराम वैद्य यांचा समावेश आहे.