सहाचाकी वाहनातून देशी दारूची वाहतूक होत असल्याची गाेपनीय माहिती अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांना प्राप्त झाली. त्यानुसार एसडीपीओ यांच्या पथकाने चामोर्शी तालुक्यातील अड्याळ गावाजवळील जंगलात सापळा रचला. आयसर वाहन क्र. एम. एच २१ एक्स- ३९६० या वाहनाची तपासणी करण्याकरिता वाहन थांबविले असता वाहनातील पाच ते सहाजण गाडीतून उतरून जंगलात पळून गेले. वाहन चालक खुशाल गंगाराम बोरकुटे, रा. किस्टापूर, ता. चामोर्शी याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने पळून गेलेल्यांची विश्वजित राप्तान ठाकूर, राजू राप्तान ठाकूर, कुमरीस राप्तान ठाकूर, असीम राप्तान ठाकूर, सर्व रा. चित्तरंजनपूर व शंकर सुखदेव राॅय, रा. बोरी (भिक्षी) अशी नावे सांगितली. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता आतील कप्प्यामध्ये ९० मिलि. मापाने भरलेले १०० निपा याप्रमाणे २५८ देशी दारूचे बॉक्स आढळून आले. त्यांची किमत १८ लाख ६ हजार रुपये हाेते. तसेच १० लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण २८ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, नापोशी मनोज कूनघाडकर, श्रीकांत भांडे, नितीन पाल, वडजू दहिफडे, पोशि उद्धव पवार, एसपीओ तिरुपती मडावी, कुणाल संतोषवार यांनी केली. पोलीस स्टेशन आष्टी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी करीत आहेत.
१८ लाखांची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 4:42 AM