गडचिरोली : अहेरी येथील मौजा मोदुमाडगू या गावात देशी-विदेशी ब्रँडचा दारूसाठा बिनापास विक्रीकरीता बाळगल्याप्रकरणी अहेरी पोलिसांनी छापा टाकून एका आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडून ८ खोक्यातील २ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. मनोज राजन्ना आत्राम (वय ३० वर्षे धंदा शेती रा. मोदुमाडगू ता. अहेरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
दिनांक ०६ ऑक्टोबरला शंकर डांगे व सोबत पोहवा जगन्नाथ मडावी असे मिळून पोलीस ठाणे अहेरी येथे गिणतीकरीता येत होते. दरम्यान, मौजा मोदुमाडगू येथील नामे मनोज राजन्ना आत्राम याच्या घरी देशी, विदेशी दारु विक्रीकरीता आणून ठेवली असल्याची गोपणीय सुत्राकडून खात्रीशीर माहिती मिळाली. सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीस पकडण्याची योजना आखली.
पोउपनि. सुधीर पाडुळे, पोहवा देवराव पेंदाम, नापोशि विनोद रणदिवे, चानापोशि दीपक कत्रोजवार असे सरकारी वाहनाने वीर बाबुराव सेडमाके चौक येथे आले. त्यानंतर, मौजा मोदुमाडगू गावात राहणाऱ्या मनोज आत्राम याच्या घराजवळ जाऊन विचारपूस केल्यानंतर त्याच्या घराची झडती घेतली. यावेळी, आत्राम याच्या नविन घरातील दुस-या खोलीमध्ये खरडयाच्या ८ बॉक्समध्ये विविध कंपन्यांचा एकूण १,९७,६०० रुपयाचा माल अवैधरित्या बिनापास परवाना विक्री करिता बाळगतांना आढळून आला. सदर मालाबाबत आत्राम, यास विचारले असता, माल रात्री किसन रामटेके रा. चंद्रपूर ह.मु. आलापल्ली ता. अहेरीज, गडचिरोली याने आमचे घरी आणून ठेवल्याचे आत्राम याने सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल व आरोपीस ताब्यात घेतले.
हा अवैध दारूसाठा पोउपनि सुधीर पाहूळे यांच्या मार्गदर्शनाखाली सविस्तर घटनास्थळ जप्ती पंचनामा तयार करुन १) हायवर्ड ५००० कंपणीची६५० मि.ली. क्षमतेची एक बॉटल, २) किंगफिशर कंपणीची६५० मि.ली. क्षमतेची एक बॉटल, ३) रॉयल स्टॅग कंपणीची ७५० मि.ली. दरमतेची एक बॉटल, ४) ईम्पेरिअल ब्लू कंपणीची ७५० मि.ली. क्षमतेची एक बॉटल, ५) रॉकेट संत्रा कंपणीची देशी दारूची९० मि.ली. क्षमतेची एक निप असे वेगळे काढून साठा सीलबंद करत सि.ए. परिक्षणा करिता पाठवण्यात आला.