शहरं
Join us  
Trending Stories
1
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
2
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
3
मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे
4
मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?
5
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
6
बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त
7
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
8
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
9
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
10
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या
11
महायुती सरकारला धडा शिकविण्याची हीच खरी वेळ; विनेश फोगाट यांचा महायुतीवर घणाघात
12
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
13
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
14
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
15
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
16
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
17
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
18
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
19
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
20
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला

गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; १० लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांना अटक

By मनोज ताजने | Published: October 08, 2022 2:39 PM

पीपीसीएम सनीरामचा समावेश

गडचिरोली : जिल्ह्याच्या उत्तर भागात मोडीत काढलेल्या नक्षल चळवळीला पुन्हा सक्रिय करण्याच्या प्रयत्नात असलेल्या नक्षल्यांच्या कंपनी १० चा प्लाटून पार्टी कमिटी मेंबर (पीपीसीएम) सनीराम याच्यासह आणखी एका नक्षलवाद्याला गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे उत्तर भागात नक्षल्यांना पुन्हा एक हादरा बसला आहे. सनीराम याच्यावर ८ लाखांचे, तर सहकारी समुराम याच्यावर २ लाखांचे बक्षीस शासनाने ठेवले होते.

धानोरा उपविभागांतर्गत येणाऱ्या सावरगाव पोलीस मदत केंद्राच्या परिसरात २ संशयित व्यक्ती आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अधिक चौकशी केली असता ते नक्षलवादीच असल्याचे समजले. त्यावरून त्यांना अटक करण्यात आली. यात सनीराम उर्फ शंकर उर्फ कृष्णा श्यामलाल नरोटे (२४ वर्ष, रा. माेरचूल, ता. धानोरा) आणि समुराम उर्फ सूर्या घसेन नरोटे (२२ वर्ष, रा. मोरचूल, ता. धानोरा) यांचा समावेश आहे.

सनीराम हा ऑक्टोबर २०१५ मध्ये टिपागड दलममध्ये भरती होऊन डीव्हीसीएम जोगन्नाचा अंगरक्षक म्हणून २०१८ पर्यंत कार्यरत होता. त्यानंतर त्याला कंपनी १० मध्ये पाठविण्यात आले. २०२० ते आतापर्यंत तो कंपनी १० मध्ये पीपीसीएम पदावर कार्यरत होता. समुराम हा जन मिलिशिया सदस्य आहे. या दोघांचाही खून, जाळपोळ, चकमक अशा अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे.

दोन वर्षांत १६ नक्षलवाद्यांना अटक

गडचिरोली पोलीस दलाने २०२० ते आतापर्यंत (दोन वर्षांत) १६ नक्षलवाद्यांना अटक केली. त्यांच्यावर शासनाने ६६ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. याशिवाय १ कोटी २४ लाखांचे बक्षीस असलेल्या १९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. तर ५५ नक्षलवाद्यांचा पोलिसांच्या गोळीने वेध घेतला. त्या मृत नक्षलवाद्यांवर ४ कोटी १० लाखांचे बक्षीस होते.

अबुझमाडमधून मिळालेल्या संदेशानुसार रेकी

गेल्या दोन ते तीन वर्षांत उत्तर गडचिरोली भागात बऱ्याचअंशी नक्षल्यांची चळवळ मोडीत काढण्यात पोलीस दलाला यश आले. पण या भागात पुन्हा चळवळ सक्रिय करण्यासाठी काय करता येईल याची रेकी करण्यासाठी सनीराम व त्याच्या सहकाऱ्याला अबुझमाड (छत्तीसगड) येथील वरिष्ठ नक्षल नेत्यांनी पाठविले होते. पण याची कुणकुण पोलिसांना लागल्याने त्यांची योजना यशस्वी होऊ शकली नाही, असे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी एएसपी समीर शेख (प्रशासन), सोमय मुंडे (अभियान), अनुज तारे (अहेरी) हे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीCrime Newsगुन्हेगारीArrestअटकGadchiroliगडचिरोली