शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

२ हजार ४०० खेळाडू दाखविणार कौशल्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 10:34 PM

आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या नागपूर विभागीय क्रीडा संमेलनाचे आयोजन २३ ते २५ डिसेंबर दरम्यान येथील जिल्हा प्रेक्षागार मैदानावर करण्यात आले आहे.

ठळक मुद्देशनिवारपासून प्रारंभ : विभागीय क्रीडा संमेलनाची जय्यत तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या नागपूर विभागीय क्रीडा संमेलनाचे आयोजन २३ ते २५ डिसेंबर दरम्यान येथील जिल्हा प्रेक्षागार मैदानावर करण्यात आले आहे. सदर संमेलनात नागपूर विभागाच्या आठ प्रकल्पातील शासकीय व अनुदानित आश्रशाळांचे जवळपास २ हजार ४०० खेळाडू विद्यार्थी सहभागी होऊन आपले क्रीडा व कला कौशल्य दाखविणार आहेत.संमेलनाचे उद्घाटन आदिवासी विकास वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार राहतील. विशेष अतिथी म्हणून खा. अशोक नेते, आ. नागो गाणार, आ. मितेश भांगडिया, आ. डॉ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे तसेच प्रमुख अतिथी म्हणून नागपूर विभागीय आयुक्त अनुपकुमार व गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात गडचिरोली, अहेरी, भामरागड, चंद्रपूर, चिमूर, देवरी, भंडारा व नागपूर या आठ प्रकल्पातील खेळाडू विद्यार्थी सहभागी होणार आहेत. क्रीडा संंमेलनाचे बक्षीस वितरण २५ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांच्या हस्ते होणार असून विशेष अतिथी म्हणून नगराध्यक्ष योगीता पिपरे तर प्रमुख अतिथी म्हणून कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, कमांडंट मनोज कुमार, देवाजी तोफा हजर राहणार आहेत.समित्यांमध्ये ३०० कर्मचाऱ्यांची नियुक्तीया क्रीडा संमेलनाचे आयोजन आदिवासी विकास नागपूर विभागाच्या अप्पर आयुक्त डॉ. माधवी खोडे यांच्या नियंत्रणाखाली व सहाय्यक जिल्हाधिकारी तथा गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी डॉ. सचिन आेंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले आहे. विभागीय क्रीडा संमेलन यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी गडचिरोली प्रकल्पाचे सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या नियंत्रणात विविध समित्या स्थापन केल्या असून नेमून दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी सर्व समित्या मिळून क्रीडा शिक्षकांसह जवळपास ३०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

टॅग्स :Sportsक्रीडा