गडचिराेली : आगामी काळात नगर परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीत विद्यमान सत्ताधारी पक्षाच्या भाेंगळ कारभारामुळे शहरातील जनता त्रस्त आहे. यामुळे काॅंग्रेस पक्षाला संधी आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेसला विजयी करण्यासाठी शहरातील प्रत्येक बूथवर २० कार्यकर्त्यांची चमू तयार करून कामाचे नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात गुरुवारी शहर काँग्रेसची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे शहर अध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हाध्यक्ष हसन गिलानी, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष वामनराव सावसाकडे, प्रदेश महासचिव अतुल मल्लेलवार, शहर उपाध्यक्ष राकेश रत्नावार, विनोद शनिवारे, शहर कार्याध्यक्ष आशिष कामडी, रजनीकांत मोटघरे, नंदू वाईलकर, संजय चन्ने, महादेव भोयर, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्यांच्या समस्येचे निराकरण करण्यात आले. या बैठकीला कुणाल ताजणे, रोहित चंदावार, राजेंद्र कुकडकर, नीता वडेट्टीवार, योगेश नैताम, अवि साळवे, रामदास टिपले, वसंत सातपुते, बाशिद शेख, राजू भारती, घनश्याम मुरवतकर, कल्पना नंदेश्वर, सुवर्णा उराडे, निळा निंदेकर, विलास केळझरकर, निखिल मुरमुरवार, जीवन मेश्राम, रोहिणी मसराम, वंदना खोडस्कर, माधुरी पडोती, आशा मेश्राम, अपर्णा खेवले, स्मिता संतोषवार, सुभाष धाईत, लहूजी रामटेके, विपुल येलटीवार हजर होते.
बाॅक्स...
नगर परिषदेकडून शहर विकासाचा बट्ट्याबाेळ
गडचिराेली पालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांच्या गटबाजीमुळे शहराचा विकास खुंटला आहे. तसेच नियाेजन शून्यतेमुळे शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. सत्ताधाऱ्यांनी पेट्राेल, डिझेल खर्चातून जनतेच्या पैशाची लूट केल्याचा आराेप यावेळी काॅंग्रेस व युवक काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला.