शुक्रवारी १३ मृत्यूसह २०४ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. त्या तुलनेत ३७९ कोरोनामुक्त झाले. त्यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येत दररोज घट होताना दिसत आहे. नवीन बाधितांची संख्या कमी झालेली दिसत असली तरी त्यामागे चाचण्यांचे प्रमाण कमी होणे हेसुद्धा एक कारण आहे. कोरोनाच्या चाचण्या वाढल्यास कदाचित हे प्रमाणही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २८ हजार ३६२ वर पोहोचला आहे. त्यापैकी २५ हजार ७६० जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या १९३२ जण रुग्णालयात आणि गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.
शुक्रवारच्या १३ मृतांमध्ये ४५ वर्षीय पुरुष आरदा, ता. सिंरोचा, ५० वर्षीय पुरुष गोंड मोहल्ला, ता. चामोर्शी, ८२ वर्षीय पुरुष विठ्ठलपूर, ता. चामोर्शी, ६७ वर्षीय पुरुष अंधारी, ता. कुरखेडा, ५० वर्षीय पुरुष मुरखडा चेक, ता. चामोर्शी, ७२ वर्षीय पुरुष दर्शनी चेक, ता. गडचिरोली, ६० वर्षीय पुरुष विवेकानंद नगर गडचिरोली, ७५ वर्षीय पुरुष आरमोठी, ता. आरमोरी, ४४ वर्षीय महिला नेताजीनगर, ता. चामोर्शी, ५७ वर्षीय पुरुष वडसा, ६२ वर्षीय महिला मुलचेरा, ७२ वर्षीय पुरुष इटखेडा, ता.अर्जुनी, जि. गोंदिया, ६० वर्षीय पुरुष रांजनगट्टा, ता. चामोर्शी यांचा समावेश आहे.
(बॉक्स)
असे आहेत नवीन बाधित व कोरोनामुक्त रुग्ण
- नवीन २०४ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ५३, अहेरी तालुक्यातील २६, भामरागड तालुक्यातील ४, चामोर्शी तालुक्यातील ३९, धानोरा तालुक्यातील ४, एटापल्ली तालुक्यातील ४, कोरची तालुक्यातील १, कुरखेडा तालुक्यातील बाधितांमध्ये १०, मुलचेरा तालुक्यातील १४, सिरोंचा तालुक्यातील २६, तर देसाईगंज तालुक्यातील २३ जणांचा समावेश आहे.
- कोरोनामुक्त झालेल्या ३७९ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील ९५, अहेरी ५२, आरमोरी १७, भामरागड ६, चामोर्शी ६४, धानोरा २१, एटापल्ली १३, मुलचेरा १४, सिरोंचा २०, कोरची ९, कुरखेडा १६ तसेच देसाईगंज येथील ५२ जणांचा समावेश आहे.
(बॉक्स)
आतापर्यंत कोरोनाचे ६७० बळी
गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेपर्यंत, अर्थात डिसेंबर २०२० पर्यंत केवळ १०८ जणांच्या मृत्यूची नोंद होती. मात्र, गेल्या साडेचार महिन्यांत ५६२ मृत्यूची भर पडून हा आकडा ६७० वर पोहोचला आहे. यात २५ ते ३० टक्के रुग्ण दुसऱ्या जिल्ह्यातील असले तरी त्यांची नोंद गडचिरोलीत घेण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा मृत्यूदर २.३६ टक्के एवढा वाढला आहे.