शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..? , वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा"
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची नाराजी दूर; ४ नोव्हेंबरला नामांकन अर्ज मागे घेणार
3
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
4
निज्जर प्रकरणात गृहमंत्री अमित शहांचे नाव घेतल्याने भारताचा संताप; कॅनडाला फटकारले
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
6
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
8
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
9
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
10
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
11
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
12
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
13
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
14
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
15
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
16
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
17
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
18
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
19
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
20
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना

२० ग्रामसभा मालामाल

By admin | Published: September 28, 2015 1:34 AM

पंचायत क्षेत्र विस्तार कायदा १९९६ व १९ आॅगस्ट २०१४ रोजीच्या राज्यपालांच्या ....

बांबू कापणी व विक्री : ८१ लाख कोषातदिलीप दहेलकर गडचिरोलीपंचायत क्षेत्र विस्तार कायदा १९९६ व १९ आॅगस्ट २०१४ रोजीच्या राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार पेसा क्षेत्रातील ग्रामसभांना बांबू कापणी, व्यवस्थापन व विक्रीचा अधिकार मिळाला आहे. या अधिकाराचा वापर करून जिल्ह्यातील पेसा हद्दीतील ग्रामसभांनी बांबूची कापणी, व्यवस्थापन व विक्री केली आहे. यातून जिल्ह्यातील २० ग्रामसभा मालामाल झाल्या असून या ग्रामसभांच्या बँक कोषात निव्वळ नफ्याचे ८१ लाख ५४ हजार ९१८ रूपये जमा झाले आहेत.२०१४-१५ या वर्षात गडचिरोली, कुरखेडा, कोरची, एटापल्ली, भामरागड, धानोरा व अहेरी या सात तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतीमधील ३६ ग्रामसभांनी वन विभागाकडे प्रस्ताव सादर करून बांबू कापणी व विक्री करण्यासंदर्भात समर्थन दर्शविले. त्यानंतर ग्रामसभांनी प्रत्यक्ष बांबूची कापणी, व्यवस्थापन व विक्री केली. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील जळेगाव, जमगाव, काळशी, मारदा, जल्लेर, एटापल्ली तालुक्यातील वटेर, गट्टेपल्ली, येडसगोंदी, कोरची तालुक्यातील येडजाल, टेमली, गोडरी, भामरागड तालुक्यातील कृष्णार, कोसफुंडी, कोडपे, तिरकामेटा, धानोरा तालुक्यातील काकडयेली, हिपानेर, बंधूर, मुंगनेर, येणगाव आदी २० ग्रामसभांना समावेश आहे. जळेगाव ग्रामसभेने १९ हजार ९१५, जमगाव ४७ हजार १६, काळशी ३ हजार ४०, जल्लेर २३ हजार ५०८, वटेर १३ हजार ४५०, गट्टेपल्ली १ हजार ९६१, येडसगोंदी ३८ हजार ४७८, येडजाल १४ हजार १९५, कृष्णार ६ हजार ८१९, कोसफुंडी २२ हजार ८८४, कोडपे १४ हजार १७४, तिरकामेटा ४ हजार ९९६, टेमली ११ हजार ६७८, हिपानेर २ लाख ९१ हजार ८७०, बंधूर ५३ हजार ८०३, मुंगनेर १ लाख ४९ हजार ९९१ येनगाव ग्रामसभेने ९७ हजार मोठ्या व मध्यम बांबूची विक्री केली.३ कोटी ४२ लाखांची मजुरी वितरितजिल्ह्यातील २० ग्रामसभांनी वन विभागाच्या मार्गदर्शनानुसार योग्यरित्या बांबूची कापणी, व्यवस्थापन व विक्री केली. या बांबू विक्रीतून हजारो मजुरांना एकूण ३ कोटी ४२ लाख ४६ हजार २४६ रूपयांची मजुरी वितरित करण्यात आली आहे. जळेगाव ग्रामसभेने ७ लाख ५८ हजार ११०, जमगाव ३७ लाख ४१ हजार १२०, काळशी १ लाख १९०, जल्लेर २० लाख ४२ हजार ३०१, वटेर ८ लाख ७४ हजार २५०, गट्टेपल्ली १ लाख २७ हजार, येडसगोंदी २६ लाख ९३ हजार, ऐडजाल ९ लाख ९३ हजार, कृष्णार ४ लाख ७७ हजार, कोसफुंडी १६ लाख १ हजार, कोडपे ग्रामसभेने ९ लाख ९२ हजारांची मजुरी मजुरांना वितरित केली.मारदा ग्रामसभेच्या बांबूची उचल नाहीगडचिरोली तालुक्यातील मारदा ग्रामपंचायतीने २०१४-१५ यावर्षात बांबूची कापणी केली. लिलाव प्रक्रिया खोळंबल्याने या ग्रामसभेच्या बांबूची उचल झाली नाही. त्यामुळे या ग्रामसभेला बांबूतून रक्कम मिळाली नाही. कोषात पैसा जमा न झालेली मारदा ही एकमेव ग्रामसभा आहे.