शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

बारावीच्या निकालात २० टक्क्यांची सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 5:00 AM

यावर्षी १६ महाविद्यालयांनी १०० टक्के निकाल दिला आहे. विज्ञान शाखेचे ४ हजार ४९० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ८० विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ७५२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या शाखेच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९६.०६ टक्के आहे. कला शाखेतील ७ हजार ३६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ५७ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत तर ११६१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.

ठळक मुद्देजिल्ह्याचा निकाल यावर्षी ८८.६६ टक्के : देसाईगंजच्या गायत्री सोनटक्केने मारली बाजी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्वाचा टप्पा असणाऱ्या बारावी परीक्षेचा निकाल यावर्षी जिल्ह्यात ८८.६६ टक्के लागला आहे. गेल्यावर्षी हा निकाल ६८.८० टक्क्यांवर घसरला होता. यावर्षी त्यात जवळपास २० टक्क्यांनी (१९.८६) सुधारणा झाली आहे. देसाईगंज येथील महात्मा गांधी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या गायत्री सुधीर सोनटक्के या विद्यार्थिनीने ९६.७७ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात पहिली येण्याचा बहुमान पटकावला. तिच्यापेक्षा थोडे कमी गुण असलेल्या गडचिरोलीतील गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या धीरज भोयर याने ९६.३० टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक तर प्लॅटिनम ज्युबिली शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मार्टिना हेमानी हिला ९२.७६ गुण मिळाल्याने तिसºया स्थानी समाधान मानावे लागले.यावर्षी फ्रेश विद्यार्थ्यांपैकी एकूण १२ हजार ५९३ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यापैकी ११ हजार १६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात १४४ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत तर २११८ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी घेतली आहे.यावर्षी १६ महाविद्यालयांनी १०० टक्के निकाल दिला आहे. विज्ञान शाखेचे ४ हजार ४९० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ८० विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ७५२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या शाखेच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९६.०६ टक्के आहे. कला शाखेतील ७ हजार ३६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ५७ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत तर ११६१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. या शाखेच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ८४.६२ आहे. वाणिज्य शाखेतील २९३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ४ विद्यार्थी प्राविण्य श्रैणीत, तर ६० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण ८९.०८ टक्के आहे. यावर्षी निकाल वाढल्यामुळे शिक्षक वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.१०० टक्के निकाल देणाऱ्या जिल्ह्यातील १६ शाळाप्लॅटिनम ज्युबिली शाळा व कनिष्ठ महाविद्यालय (प्राविण्य श्रेणीत १४), मोहसीनभाई जव्हेरी कनिष्ठ महाविद्यालय वडसा (प्राविण्य श्रेणीत ४), डॉ.बाबासाहेब आंबेडकर विज्ञान महाविद्यालय आरमोरी (प्राविण्य श्रेणीत ३), शासकीय आश्रमशाळा कनिष्ठ महाविद्यालय जिमलगट्टा (प्राविण्य श्रेणीत २), राजे धर्मराव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आसरअली (प्रावीण्य श्रेणीत १) महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय आरमोरी, शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा लाहेरी, शहीद बाबुराव शेडमाके कनिष्ठ महाविद्यालय आमगाव (महल), श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आष्टी, स्व.रमेशबाबू कनिष्ठ महाविद्यालय रेगडी ता.चामोर्शी, राजर्षी शाहू महाराज विज्ञान महाविद्यालय चामोर्शी, यशोदादेवी इंग्रजी माध्यम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय वडसा, धनंजय स्मृती कला व कनिष्ठ महाविद्यालय बेतकाठी, ता.कोरची, शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा बामणी, संत मानवदयाल कनिष्ठ महाविद्यालय रंगयापल्ली, डिज्नेलँड इंग्लिश मिडियम स्कूल, सिरोंचा

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल