लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दिवसेंदिवस पिकांवर कीटकनाशक फवारण्याचे प्रमाण वाढत चालले असून गडचिरोली सारख्या जिल्ह्यातही वर्षभरात कीटकनाशकांच्या विक्रीची उलाढाल वर्षाला सुमारे २० कोटी रूपयांच्यावर असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाºयांनी दिली आहे. यावरून कीटकनाशकांच्या विस्तीर्ण बाजारपेठेचा अंदाज येतो. यवतमाळ जिल्ह्यात नुकताच २० शेतकºयांचा कीटनाशकांच्या फवारणीदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे कीटकनाशकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.गडचिरोली जिल्ह्यात मुख्यत्वे धान, कापूस, तूर, सोयाबीन, मका आदी पिकांचे उत्पादन घेतले जाते. यातील धानपिकावर पावसाळ्यादरम्यान तुडतुडा, गादमाशी आदी रोगांचा प्रादुर्भाव होतो. पिकांवरील रोगांचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करतात. सातत्याने होणाºया फवारणीमुळे दिवसेंदिवस कीटक व किडींचीही प्रतिकार क्षमता वाढत चालली आहे. त्यामुळे अधिक प्रमाणात कीटकनाशकांची मात्रा वापरावी लागत आहे. त्याचबरोबर अनेकवेळा फवारणीही करावी लागत आहे. किडींची प्रतिकार क्षमता वाढल्याने कंपन्यांनी आणखी विषारी कीटकनाशकांची निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी थोडीही चुकी शेतकºयाच्या हातून झाल्यास त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत.१० वर्षांपूर्वी अगदी काही मोजके शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करीत होती. आता मात्र अगदी पºहे टाकल्यापासून कीटकनाशकांची फवारणी केली जाते. त्यामुळे कीटकनाशकांची विक्री प्रचंड प्रमाणात वाढली आहे. गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने क्लोरोफायरिफॉस, प्रोफेलोफॉस, क्लोरी प्लस, सायफेरमेथ्रिन, लॅमराथ्रिन, एमीडायक्लोफिड, मोनोप्रोटोफॉस, डायमेथेट, कार्बंेडायझिन, फोरेट आदी कीटकनाशकांची प्रामुख्याने फवारणी केली जाते. सातत्याने कीटकनाशकांच्या फवारणीमुळे अन्नधान्यात विषाचे प्रमाण वाढत चालले आहे. ही भविष्यासाठी धोक्याची घंटा ठरणार आहे. मात्र कीटकनाशकांच्या फवारणीवर सरकारी यंत्रणेचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे खासगी कंपन्यांचा पसारा प्रचंड प्रमाणात वाढत चालला आहे. खताप्रमाणेच कीटकनाशकांच्याही खरेदी व विक्रीवर कृषी विभागाचे नियंत्रण असावे, अशी मागणी आता शेतकरीवर्गाकडून होत आहे.माहिती मागितलीकीटकनाशकांचे त्यांच्यात असलेल्या विषारी तीव्रतेवरून लाल, पिवळा, हिरवा असे प्रकार पडले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील कृषीकेंद्र चालकांकडे नेमक्या कोणत्या प्रतीची कीटकनाशके उपलब्ध आहेत, याबाबतची माहिती पंचायत समितीच्या मार्फत मागविण्यात आली आहे, अशी माहिती जि. प. चे कृषी अधिकारी शेरेन पठाण यांनी दिली आहे.फवारणी करताना शेतकºयांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबतचे सूचनापत्र कृषी केंद्राच्या भिंतीवर लावणे सक्तीचे केले आहे.तणनाशकांच्या फवारणीचेही प्रमाण वाढलेगडचिरोली जिल्ह्यात सुमारे १५० पेक्षा अधिक कंपन्यांची कीटकनाशके उपलब्ध आहेत. ५२५ बियाणे व कीटकनाशके दुकानांमधून या कीटकनाशकांची विक्री केली जाते. मात्र कीटकनाशकांच्या विक्रीवर शासकीय यंत्रणेचे कोणतेही नियंत्रण नाही. याचा फायदा कीटकनाशक कंपन्या व विक्रेते घेत आहेत. बेभाव किंमतीला कीटकनाशकांची विक्री केली जात आहे. ५० रूपयाला विक्रेत्याला मिळणाºया कीटकनाशकावर जवळपास ३०० रूपये किंमत लिहिली राहते व सदर कीटकनाशक शेतकºयाला २५० रूपयांत विकले जाते. प्रशासकीय यंत्रणेचे नियंत्रण नसल्याने हा सर्व प्रकार खुलेआम सुरू आहे. कीटकनाशकांच्या जोडीला आता तणनाशकांच्या फवारणीचेही प्रमाण गडचिरोली जिल्ह्यात प्रचंड वाढले आहे.
कीटकनाशकांची उलाढाल २० कोटींवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 1:45 AM
दिवसेंदिवस पिकांवर कीटकनाशक फवारण्याचे प्रमाण वाढत चालले असून गडचिरोली सारख्या जिल्ह्यातही वर्षभरात कीटकनाशकांच्या विक्रीची उलाढाल वर्षाला सुमारे २० कोटी रूपयांच्यावर.....
ठळक मुद्देवापर वाढला : अधिकाधिक विषारी कीटकनाशकांचा फवारणीसाठी होत आहे वापर