शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी घडामोड! प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी निर्णय बदलला, सिंदखेड राजामध्ये शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
4
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
5
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
6
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
7
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
8
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
9
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
10
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
11
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
12
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
13
Mamaearth Shares: कंपनीचा शेअर आपटला; २० टक्क्यांची घसरण, IPO प्राईजच्याही खाली आला भाव
14
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
15
IND vs AUS टेस्टआधी आणखी एक ट्विस्ट; स्पेशल कॉलनंतर पुजारा 'फ्लाइट मोड'वर
16
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
17
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
18
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
19
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
20
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!

२० दारू विक्रेत्यांच्या घरांवर धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 1:33 AM

सिरोंचा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अमरावती गावात राहत्या घरातून अवैधरित्या दारू काढून तिची विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी बुधवारी २० दारूविक्रेत्यांच्या घरावर धाड टाकून दोन ते तीन लाखांचा मुद्दमाल जप्त केला.

ठळक मुद्देलाखोंचा मुद्देमाल जप्त : सिरोंचा पोलीस ठाणे व मुक्तिपथ अभियानातर्फे कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सिरोंचा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अमरावती गावात राहत्या घरातून अवैधरित्या दारू काढून तिची विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी बुधवारी २० दारूविक्रेत्यांच्या घरावर धाड टाकून दोन ते तीन लाखांचा मुद्दमाल जप्त केला.अमरावती येथे अनेक दिवसांपासून अवैधरित्या दारू काढली जात आहे. गावात अवैध दारूनिर्मिती करून तिची सिरोंचा परिसरातील गावात विक्री व पुरवठा केला जात होता. येथील अवैध दारूविक्रेत्यांमुळे गावपरिसरातील अनेक लोकांना दारूचे व्यसन जडले होते. या दारूविक्रेत्यांच्या विरोधात अनेक नागरिकांनी तक्रारीही केल्या होत्या. येथील अवैध दारूविक्रीची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सिरोंचा पोलीस ठाणे व मुक्तिपथ अभियानच्या कार्यकर्त्यांनी अमरावती येथील २० अवैध दारूविक्रेत्यांच्या घरावर धाडी टाकून त्यांच्याकडून मोहफूल सडवा, दारू व दारू निर्मितीकरिता लागणारे साहित्य जप्त केले. गावात अवैधरित्या सुरू असलेले संपूर्ण अड्डे नष्ट केले. सोबतच दोन अवैध दारूविक्रेत्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. सदर कारवाई सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनात सिरोंचा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पतंगराव पाटील, पोलीस उपनिरीक्षक आनंद टेकाम, मुक्तिपथ अभियानाचे जिल्हा उपसंचालक संतोष सावळकर, मुक्तिपथ अभियानाचे तालुका संघटक किशोर मल्लेवार, उपसंघटक महेंद्र सदनपू, तालुका प्रेरक संतोष चंदावार यांच्यासह पोलीस कर्मचाºयांनी केली.

टॅग्स :liquor banदारूबंदी