लोकमत न्यूज नेटवर्कझिंगानूर : जिल्हा पोलीस प्रशासन व उपपोलीस स्टेशन झिंगानूर यांच्या वतीने झिंगानूर येथे आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात २०० लोकांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधींचे वितरण करण्यात आले.दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सोयीसुविधांचा लाभ मिळावा यासाठी आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात उपस्थित नागरिकांची सिकलसेल, मलेरिया, दमा, ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन, डायबिटीस तसेच अन्य आजाराची तपासणी करण्यात आली. झिंगानूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चमूने नागरिकांची आरोग्य तपासणी ेकेली. यावेळी जवळपास २०० लोकांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आला. दरम्यान नागरिकांना आरोग्यविषयक विविध समस्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. वैैद्यकीय अधिकारी डॉ. राऊत यांनी आरोग्य तपासणी करून विविध आजारांवर मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपस्थित महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. मेळावादरम्यान नक्षलविरोधी प्रचार करण्यात आला. असामाजिक तत्त्वांच्या भूलथापांना बळी न पडता आपला विकास साधण्यावर भर द्यावा. तसेच स्थानिक नागरिकांनी नक्षल चळवळीला विरोध करुन मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रसंगी केले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या मेळाव्याला झिंगानूर उपपोलीस स्टेशनच्या हद्दीतील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.जीवनावश्यक वस्तू वाटपमेळाव्याला उपस्थित नागरिकांना पोलीस विभागातर्फे जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले. बचत गटाच्या महिलांना बचत गटाची माहिती देण्यात आली. महिलांनी पैैशांची काटकसर करून बचत करावी. तसेच बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्माण करून आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन करण्यात आले.
२०० लोकांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 1:21 AM
जिल्हा पोलीस प्रशासन व उपपोलीस स्टेशन झिंगानूर यांच्या वतीने झिंगानूर येथे आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात २०० लोकांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधींचे वितरण करण्यात आले.
ठळक मुद्देझिंगानूर येथे शिबिर : उप पोलीस ठाण्याचा पुढाकार; औषधींचे मोफत वितरण