लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : ट्रकमध्ये कोंबून कत्तलीसाठी घेऊन जात असलेला ट्रक अडवून २१ जनावरांना जीवनदान देण्यात आले. सदर कारवाई देसाईगंज पोलिसांनी शनिवारी केली. यामध्ये तीन आरोपींना अटक केली आहे.सैजाद अहमद अब्दुल वहीद शेख (३०), आरिफ साबिर शेख (३४), दिनेश तुळशिराम धाबेकर (३६) तिघेही रा.अड्याळ ता. पवणी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. एमएच-३१-सीबी-६६२१ क्रमांकाच्या ट्रकमध्ये बैल मांडून ते कत्तलीसाठी गोंदिया जिल्ह्यात नेण्यात येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली. अर्जुनी मोरगाव मार्गावरील वनविभागाच्या नाक्यापासून एक किमी अंतरावर सापळा रचून ट्रक थांबविला. ट्रकची पाहणी केली असता, ट्रकमध्ये २१ जनावरे आढळून आले. पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन आरोपींना अटक केली. आरोपींवर महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम १९९५ कलम ५, ५ (अ), ५(ब), प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम ११ (अ),(ड),(ई),(फ) मोटार वाहन अधिनियमाअंतर्गत कलम १८३, १८४, १९६ अन्वये गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सूरज गोरे करीत आहेत. सदर सापळा देसाईगंजचे ठाणेदार सिद्धानंद मांडवकर यांच्या मार्गदर्शनात रचण्यात आला. याचवेळी एमएच-३८-३१५२ याक्रमांकाची कारही जप्त केली आहे.
२१ जनावरांना मिळाले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 1:06 AM
ट्रकमध्ये कोंबून कत्तलीसाठी घेऊन जात असलेला ट्रक अडवून २१ जनावरांना जीवनदान देण्यात आले. सदर कारवाई देसाईगंज पोलिसांनी शनिवारी केली. यामध्ये तीन आरोपींना अटक केली आहे.
ठळक मुद्देदेसाईगंज पोलिसांचा सापळा : तीन आरोपींना अटक