शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
2
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
3
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
4
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
5
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
7
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
8
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
9
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
11
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
12
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
13
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
14
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
15
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
16
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
17
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
18
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
19
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?

नागपूरसाठी २१५ रूपये तिकीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:57 AM

एसटीने तिकिटाच्या दरात १८ टक्के वाढ लागू केली आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. जलद बसची गडचिरोली-नागपूरचे तिकीट यापूर्वी १८४ रूपये होते. आता २१५ रूपये जादा मोजावे लागणार आहेत.

ठळक मुद्देशिवशाहीचेही तिकीट महागले : १८ टक्के भाडेवाढीचा एसटी प्रवाशांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एसटीने तिकिटाच्या दरात १८ टक्के वाढ लागू केली आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. जलद बसची गडचिरोली-नागपूरचे तिकीट यापूर्वी १८४ रूपये होते. आता २१५ रूपये जादा मोजावे लागणार आहेत.सातत्याने वाढत असलेल्या डिझेलच्या दरवाढीमुळे एसटी आर्थिक अडचणीत आली होती. त्याचबरोबर नुकतीच एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढही देण्यात आली. वाढत्या महागाईसोबत आर्थिक ताळमेळ जुडविण्यासाठी एसटीला भाडेवाढ करणे आवश्यक झाले होते. त्यानुसार शुक्रवारी १८ टक्के भाडेवाढ जाहीर करण्यात आली. ही भाडेवाढ लागू सुध्दा करण्यात आली आहे. गडचिरोली आगारातून सर्वाधिक बसेस नागपूरसाठी सुटतात. यापूर्वी नागपूरचे प्रवास भाडे १८४ रूपये होते. भाडेवाढीनंतर ते आता २१५ रूपये करण्यात आले आहे. नवीन भाडेवाढीनुसार अहेरी-चंद्रपूरचे तिकीट १५५ रूपये, अहेरी-गोंडपिपरीमार्गे नागपूरचे तिकीट ३५० रूपये, अहेरी-गडचिरोली ८५ रूपये व अहेरी-यवतमाळ ३३८ रूपये करण्यात आली आहे.गडचिरोली आगारातून नागपूरसाठी शिवशाही बसेस सोडल्या जातात. शिवशाही बसेसच्याही भाड्यात वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी गडचिरोली-नागपूरचे शिवशाहीचे तिकीट २७३ रूपये होते. ते आता ३२० रूपये करण्यात आले आहे. गडचिरोली आगारातून शिवशाही बससेवा उन्हाळ्यात सुरू करण्यात आली होती. त्यामुळे शिवशाहीला काही प्रमाणात प्रवाशी मिळत होते. तरीही खासगी बसच्या तुलनेत भाडे अधिक आहे, अशी तक्रार होती. आता पावसाळ्याला सुरूवात झाली आहे. त्यामुळे वातानुकूलित वाहनाची प्रवाशांना पाहिजे तेवढी आवश्यकता नाही. अशातच भाडेवाढ झाली आहे. त्यामुळे शिवशाहीला प्रवाशी मिळविताना चांगलीच अडचण जाणार आहे.एसटीनेही भाडेवाढ करीत महागाईत आणखी भर टाकली आहे. दुर्गम भागातील नागरिक, विद्यार्थी यांनाही भाडेवाढीचा फटका बसणार आहे.चिल्लरचा प्रश्न मिटविलायापूर्वी एसटीचे तिकीट अगदी किलोमीटरच्या हिशोबाप्रमाणे होते. त्यामुळे एक ते दोन रूपयांच्या चिल्लरचा तुटवडा निर्माण होत होता. प्रवाशी वाहकाच्या हातात सरळ ५० किंवा १०० ची नोट ठोकून तिकीटाचा हिशोब वगळता पैसे परत मागत होते. वाहकाकडे चिल्लर राहत नसल्याने बºयाच वेळा वादही होत होते. कित्येक वेळा चिल्लरसाठी एसटी बसथांब्यावर काही वेळ थांबवावी लागत होती. नवीन भाडेवाढीत चिल्लरचा प्रश्न मिटविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पाच रूपयांच्या पटीने भाववाढ करण्यात आली आहे. यानंतरची तिकीट १५, २०, २५ रूपये अशा स्वरूपात राहणार आहे. पाचच्या पटीतील पैसे वाहक सहज उपलब्ध करून देऊ शकेल. त्यामुळे चिल्लरसाठी होणारे वाद संपुष्टात येतील, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ