मार्च ते जून या कालावधीत जंगलाला सर्वाधिक आगी लागत असल्याने या कालावधीत वन विभागाचे आगींवर विशेष लक्ष राहते. तसेच आगीच्या घटनांची नाेंदही केली जाते. १ ते १९ मार्च या १९ दिवसांच्या कालावधीत सुमारे २२२.७५ हेक्टर जंगलाला आगी लागल्या आहेत. सर्वाधिक जंगल सिराेंचा तालुक्यातील जळाले आहे. ६६ घटनांमध्ये ७०.३० हेक्टर जंगलाला आग लागली आहे.
बाॅक्स .....
सॅटेलाईटमुळे वेळीच नियंत्रण शक्य
जंगलांना लागणाऱ्या आगीची माहिती सॅलेलाईटच्या माध्यमातून सर्वे ऑफ इंडियाकडे पाठविली जाते. यामध्ये अक्षांश व रेखांशाची नाेंद राहते. त्यामुळे नेमक्या काेणत्या भागात आग लागली आहे, याची माहिती वन विभागाला मिळते. प्रत्येक वन कर्मचाऱ्याचे व्हाॅट्स- ॲप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. यामध्ये वरिष्ठ अधिकारीसुद्धा आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत आगीचा संदेश संबंधित ग्रुपमध्ये टाकला जाते. त्यामुळे स्थानिक स्तरावर काम करणारे वनरक्षक, वनपाल, वनमजूर वेळीच सजग हाेऊन आग विझवितात. त्यामुळे जंगलाचे हाेणारे माेठे नुकसान थांबण्यास मदत हाेते.
बाॅक्स .....
पावसाअभावी जास्त नुकसान
ऑक्टाेबर महिन्यापासून पावसाने कायमची दडी मारली आहे. पाऊस नसल्याने जंगलातील पालापाचाेळा व शेतातील गवत पूर्णपणे वाळले आहे. त्यामुळे थाेडीही आगीची ठिणगी लागताच आग पसरते. अजूनही बहुतांश तालुक्यांमध्ये पाऊस झाला नाही. त्यामुळे यावर्षी जंगलांना आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ हाेणार आहे. परिणामी वन विभागाला विशेष सजग रहावे लागणार आहे. ज्यावर्षी जानेवारी, फेब्रुवारीमध्ये पाऊस पडतो त्यावर्षी जंगल कमी प्रमाणात जळत असल्याचा अनुभव आहे.
बाॅक्स....
वन विभागामार्फत जागृती
माेहफूल वेचण्यासाठी किंवा धुरे जाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आग लावू नये, जंगलाला लागलेल्या आगीमुळे जैवविविधतेचे कसे नुकसान हाेते, याबाबत वन विभागामार्फत जागृती केली जात आहे. तसेच काही ठिकाणी माेहाच्या झाडाखालचा पालापाचाेळा वन विभागाचे कर्मचारी स्वत: ब्लाेअर मशीनने काढून देत आहेत.
बाॅक्स ...
१ ते १९ मार्चपर्यंत जळालेले जंगल
वनविभाग घटना जळालेले क्षेत्र (हेक्टर)
गडचिराेली ९८ ५२.९२
आलापल्ली ३८ ६.८
देसाईगंज ९२ ४२.७३९
सिराेंचा ६६ ७०.३०
भामरागड २८ ४९.९७
एकूण ३२२ २२२.७५