लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : आदिवासी विकास विभागाच्या कोरची येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात असलेल्या संस्थात्मक विलगीकरण कक्षात सद्य:स्थितीत २३ नागरिक आहेत. यामध्ये १९ पुरूष व ३ महिलांचा समावेश आहे.कोरोना लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथीलता देण्यात आली असून अनलॉक करण्यात आले आहे. दरम्यान प्रवासातून आलेल्या संशयास्पद नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. संशयीत प्रवाशी व लोकांना आदिवासी मुलींच्या वसतिगृहात विलगीकरणात ठेवून त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. दरम्यान कोरची येथील काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शामलाल मडावी व युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राहूल अंबादे यांनी भेट देऊन सोयीसुविधांची माहिती जाणून घेतली. दरम्यान विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्तींना सकाळी चहा, बिस्कीट, दुपारी व रात्री भोजन दिले जात असून येथे स्वच्छता पाळली जात असल्याचे दिसून आले.सदर विलगीकरण कक्षातील एकूण ४३८ व्यक्तींची शुक्रवारपर्यंत कोरोनाबाबत चाचणी घेण्यात आली. यापैकी आठ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले. त्यांच्यावर आरोग्य विभागामार्फत औषधोपचार सुरू आहे. येथे कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. राहूल राऊत, डॉ. शितल उईके व कर्मचारी सेवा देत आहेत.अनलॉक झाल्यापासून प्रवास करणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढली आहे. परिणामी गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा वाढत आहे. हा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा यंत्रणेसह कोरची तालुका प्रशासन व आरोग्य विभाग योग्य ती खबरदारी घेत आहेत.
कोरचीतील २३ नागरिक विलगीकरणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 9:53 PM
दरम्यान प्रवासातून आलेल्या संशयास्पद नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. संशयीत प्रवाशी व लोकांना आदिवासी मुलींच्या वसतिगृहात विलगीकरणात ठेवून त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. दरम्यान कोरची येथील काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शामलाल मडावी व युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राहूल अंबादे यांनी भेट देऊन सोयीसुविधांची माहिती जाणून घेतली.
ठळक मुद्दे४३८ जणांची कोरोना तपासणी : बाधित आठ जणांवर सुरू आहे औषधोपचार