आतापर्यंत १० हजार १६४ जण कोरोनाबाधित झाले असून, त्यापैकी ९७५४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ३०२ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १०८ जणांचा मृत्यू झाला आहे. दोन महिन्यांपासून कोरोना रुग्ण वाढत असले तरी मृत्यू होण्याचे प्रमाण नसल्यामुळे ही बाब थोडी दिलासादायक ठरत आहे. जिल्ह्यात मृत्युदर १.०६ टक्के झाला आहे.
नवीन २३ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १८, भामरागड तालुक्यातील १, धानोरा तालुक्यातील १, चामोर्शी २, तर देसाईगंज तालुक्यातील एका जणाचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या ३८ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील २१, आरमोरी ५, धानोरा १, एटापल्ली ३, कोरची ६, कुरखेडा ४, तर देसाईगंजमधील २ जणांचा समावेश आहे.
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील सर्वोदय वाॅर्ड १, नवेगाव २, गुरुकुंज कॉलनी १, शाहूनगर ३, वनश्री कॉलनी २, चामोर्शी रोड १, गोकुलनगर १, शिवाजीनगर १, आरटीओ ऑफिसजवळ १, स्थानिक १, प्लॅटिनम ज्युबिली शाळेजवळील १, डोंगरगाव १, चामोर्शी तालुक्यातील आष्टीचे २, धानोरा तालुक्यातील स्थानिक १, भामरागड तालुक्यातील लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा १, वडसा तालुक्यातील कुरुड १, तर इतर जिल्ह्यांतील एक जण बाधित आहे.